शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्या जीवनावर आधारित ‘यूटी ६९’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात स्वतः राज कुंद्रा झळकणार आहे. ३ नोव्हेंबरला ‘यूटी ६९’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून आज चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा सोहळा पार पडला. यावेळी राज कुंद्राने पहिल्यांदाच चेहऱ्यावरील मास्क काढून माध्यमांबरोबर संवाद साधला. अनेक प्रश्नांची उत्तर त्याने दिली. शिवाय तो भावुकही झाला. सध्या त्याच्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये राज कुंद्राने एक वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, “माणुसकी शिल्लक आहे”

सेलिब्रिटी ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर राज कुंद्राचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राज म्हणतोय, “आपला देश एन्जॉय करतोय. म्हटलं जात ना, देशात आणि बॉलीवूडमध्ये दोन गोष्टी विकल्या जातात शाहरुख खान आणि सेक्स.” राज कुंद्राचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Video: प्रसाद ओक स्वप्नील जोशीला देत होता वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पण घडलं भलतंच, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: अखेर सईला मिळणार आईची माया? असा रंगणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड…

राज कुंद्राच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘एवढं सगळं होऊनही हा इतकं घाणेरड बोलतोय. लाज वाटली पाहिजे’, ‘किती बकवास बोलतोय हा. तू मास्कमध्येच चांगला दिसतोस’, ‘हा पुन्हा जेलमध्ये जाईल’, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर नेटकरी देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २०२१ला पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. अश्लील चित्रपट बनवण्याचं रॅकेट चालवतं असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. अनेक महिलांनी राज कुंद्राविरोधात साक्ष दिली होती. या प्रकरणानंतर शिल्पाने आपल्या दोन्ही मुलांना घेऊन राज कुंद्राच घर सोडल्याची अफवा पसरली होती. पण शिल्पाने असं काही न करता पती राजच्या पाठिशी खंबीर उभी राहिली होती. सर्व आरोप निराधार असल्याचं तिनं सांगितलं होतं.