Premium

रणवीर सिंगच्या कारकिर्दीला नाही लागणार ब्रेक; ‘या’ पाच बिग बजेट चित्रपटात झळकणार अभिनेता

रणवीर आता ‘सिंघम ३’मध्येही अजय देवगणबरोबर अॅक्शन करताना दिसणार आहे

ranveersingh
फोटो : सोशल मीडिया

२०१० मध्ये आलेल्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीर सिंगने आपल्या अभिनयाच्या करिकीर्दीला सुरुवात केली. एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या रणवीर सिंगचे सध्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. रणवीरचे ‘८३’, ‘जयेशभाई जोरदार’ आणि ‘सर्कस’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. याचा अभिनेत्याच्या आगामी कारकिर्दीवर चांगलाच परिणाम होणार अशी चर्चा होत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतकंच नव्हे तर मीडिया रीपोर्टनुसार YRF ने सध्यातरी रणवीर सिंगबरोबर कोणताही चित्रपट न करण्याचा निर्णय घेतल्याचं मध्यंतरी स्पष्ट झालं होतं. पण आता लवकरच रणवीरचं नशीब बदलणार आहे. येत्या काही वर्षात एक दोन नव्हे तर तब्बल ५ मोठ्या चित्रपटात रणवीर सिंग झळकणार आहे.

आणखी वाचा : सई ताम्हणकरचा लेस्बियन लिपलॉक, आदिनाथ कोठारेचा डॅशिंग अंदाज, अन्… ‘क्राइम बीट’ सीरिजचा टीझर प्रदर्शित

त्यामुळे रणवीरच्या कारकिर्दीला ब्रेक लागण्याच्या चर्चेलाच पूर्णविराम मिळणार आहे. सध्या रणवीर सिंग करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून करण जोहर पुन्हा दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहे. रणवीरसह यात आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच शाहरुख खानने ‘डॉन ३’मधून बाहेर पडल्यानंतर रणवीर ‘डॉन’म्हणून दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे.

रणवीर आता ‘सिंघम ३’मध्येही अजय देवगणबरोबर अॅक्शन करताना दिसणार आहे. या वर्षअखेरपर्यंत रणवीर ‘सिंघम ३’चं काम सुरू करणार आहे. यानंतर रणवीर सिंग पुन्हा संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर ‘बैजू बावरा’मध्येही दिसणार आहे. बऱ्याच काळापासून भन्साळी या चित्रपटावर काम करत आहेत. फेब्रुवारीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

याबरोबरच रणवीर सिंग दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांच्याबरोबर ‘अपरिचित’च्या रिमेकवर काम करत आहे. मध्यंतरी याबद्दल वाद निर्माण झाला होता. तर लोकप्रिय टीव्ही मालिका ‘शक्तिमान’ आता मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या स्वरूपात येणार आहे आणि यासाठीही रणवीर सिंगच्या नावाची चर्चा होत आहे. एकूणच रणवीरच्या कारकिर्दीला कोणताही ब्रेक न लागता येत्या काही वर्षात तो या मोठ्या चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranveer singh is all set to work with sanjay leela bhansali and 5 big budget film avn