सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर ३’ रविवारी (१२ नोव्हेंबरला) प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. मात्र, आता हळूहळू चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत आहे. अशातच चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

हेही वाचा- “देव सर्वोत्कृष्ट लेखक”! विराट कोहलीच्या ५० व्या शतकानंतर अनुष्का शर्माची पोस्ट; म्हणाली, “मला तुझं प्रेम…”

‘सॅकनिल्क’च्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘टायगर ३’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ४४.५० कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५७.५० कोटींचा गल्ला जमवला होता. केवळ दोन दिवसांमध्येच चित्रपटाने १०२ कोटींचा आकडा गाठला होता, तर तिसऱ्या दिवशी ‘टायगर ३’ने ४२.५० कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र, चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण बघायला मिळत आहे. ‘टायगर ३’ने चौथ्या दिवशी केवळ २२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या कमाईसह चित्रपटाचे एकूण कलेक्शन १६९.५० कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे.

हेही वाचा- Video: “मी असं कृत्य…”, सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला मारल्याबद्दल नाना पाटेकरांनी मागितली माफी, म्हणाले…

‘टायगर ३ʼने पहिल्या तीन दिवसांत या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जवान, पठाण आणि गदर २ या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. चौथ्या दिवशी जरी चित्रपटाच्या कमाईत घट नोंदवण्यात आली, तरी आठवड्याच्या शेवटी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्यात हा चित्रपट ३०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- “मी एक अशी व्यक्ती…”, रिलेशनशिपबद्दल ‘त्या’ विधानामुळे झालेल्या ट्रोलिंगबद्दल दीपिका पदुकोणचे वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टायगर ३’मध्ये सलमानबरोबर कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात इमरानने खलनायकाची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांकडून इमरानच्या या भूमिकेला मोठी पसंती मिळत आहे. यापूर्वी या फ्रेंचायजीचे ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी जबरदस्त कमाई केली होती. तीन दिवसांत १५० कोटींची कमाई करणारा ‘टायगर ३’ ही लवकरच ५०० कोटींच्या कल्बमध्ये सामील होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.