अभिनेता सलमान खान हा त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. वयाची पन्नाशी ओलांडली तरीही तो अजून अविवाहित आहे. त्यामुळे तो लग्न कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता अखेर सलमानने याबाबत मौन सोडले आहे.

सलमान खानने नुकतीच रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याला त्याच्या कामाबद्दल, वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्या सर्व प्रश्नांची सलमानने त्याच्या हटके शैलीत उत्तर दिली. यासोबतच त्याने त्याच्या लग्नाबद्दलही मोकळेपणाने भाष्य केले.

हेही वाचा : “पैसा यांना काय काय करायला लावतो…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे सलमान खान व अक्षय कुमार ट्रोल

या कार्यक्रमात रजत शर्मा यांनी सलमान खानला विचारले की तू लग्न कधी करणार आहेस? याला उत्तर देताना तो म्हणाला, “जेव्हा अल्लाहची इच्छा असेल तेव्हा सर. लग्नात दोन व्यक्तींची गरज असते. पूर्वी मी हो म्हणायचो आणि मुली नाही म्हणायच्या. जेव्हा मुली लग्नाला तयार होत्या तर मी नकार द्यायचो. आता तर दोन्ही बाजूंनी नकार येतो आहे. आता जेव्हा दोघांकडून होकार येईल तेव्हा लग्न होईल, पण त्याला अजून वेळ आहे.”

आणखी वाचा : “हा वेडा झाला आहे का…?” ‘किसी का भाई किसी की जान’मधील नव्या गाण्यामुळे सलमान खान ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे रजत शर्मा यांनी त्याला विचारले, “लग्न करण्याचा तुझा काही विचार आहे की नाही? यावर उत्तर देताना सलमान खान म्हणाला, “सर, माझ्यावर खूप दबाव आला आहे… आजकाल माझे आई-वडीलही मला त्याच नजरेने पाहतात. थोडेसे दडपण असते. ज्यांनी लग्न केले आहे ते त्यांच्या आयुष्यात फारच खूश आहेत. मला इतका आनंद नको.” आता सलमानचे हे उत्तर खूप चर्चेत आले आहे.