scorecardresearch

Premium

‘अ‍ॅनिमल’साठी रणबीर कपूर नव्हे, तर साऊथचा ‘हा’ सुपरस्टार होता पहिली पसंती? दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा….

१ डिसेंबरला रणबीरचा बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ranbeer sandeep
'अ‍ॅनिमल'साठी रणबीर कपूर दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हता

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवकरच त्याचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये प्रेक्षकांना रणबीरचे हिंस्र रूप बघायला मिळाले. प्रेक्षकांकडून या टीझरला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. सध्या रणबीर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. वडील आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारे या चित्रपटाचे कथानक आहे.

हेही वाचा- ‘अ‍ॅनिमल’मधील ती अवाढव्य गन कम्प्युटरवर बनवलेली नाही; ५०० कीलोचं ‘वॉर मशीन’ बनवायला लागले इतके महीने

kabhi-haan-kabhi-naa
‘कभी हां कभी ना’च्या रिमेकमध्ये शाहरुख खानची भूमिका कुणी करावी? सूचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या, “हे पात्र…”
film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
PM Modi PM Modi on Article 370on Article 370
“हा चित्रपट कसा आहे याबद्दल…”, पंतप्रधान मोदींनी जम्मूमध्ये केला ‘आर्टिकल ३७०’ चा उल्लेख; यामी गौतम म्हणाली…
sandeep-reddy-vanga
“…तर मी हॉलिवूडमध्ये जाईन”, जेव्हा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी केलेलं मोठं वक्तव्य

पण या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी रणबीर नाही तर साऊथचा सुपरस्टार महेश बाबू दिग्दर्शकांची पहिली पसंती असल्याची चर्चा रंगली होती. अ‍ॅनिमलचे दिग्दर्शक संदीप रेड्डी यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही भूमिका महेश बाबूला ऑफर केली होती. एवढंच नाही तर अ‍ॅनिमल चित्रपटाचे सुरुवातीला नाव डेव्हिल ठेवण्यात आले होते अशी चर्चा रंगली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी यांनी याबाबत खुलासाही केला आहे.

संदीप रेड्डी म्हणाले, महेश बाबूंना एक चित्रपट ऑफर करण्यात आला होता. त्या चित्रपटाचे नाव होते ‘डेव्हिल’. होते ते म्हणाले की, “महेश बाबूने तो चित्रपट नाकारला नसून काही कारणास्तव हा चित्रपट होऊ शकला नाही.”

हेही वाचा- ‘टायगर ३’मधील कतरिनाच्या ‘त्या’ टॉवेल फाइट सीनवर विकी कौशलने सोडले मौन; म्हणाला “माझी बिलकूल इच्छा नाही की..”

महेश बाबूला या चित्रपटाची स्क्रिप्ट स्वत:साठी आणि प्रेक्षकांसाठी अप्रासंगिक वाटली. महेश बाबूने संदीप यांना चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करण्याची विनंती केली होती. कारण महेश बाबूला चित्रपटाचा विषय खूप गंभीर वाटला होता. मात्र, संदीप रेड्डीने चित्रपटाची स्क्रिप्ट बदलण्यास नकार दिला. त्यानंतर ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरला मुख्य अभिनेता म्हणून घेण्यात आले

हेही वाचा- ‘रॉकी और रानी…’ सिनेमातील ‘रंधावा पॅराडाईज’ मध्ये एकाचा खून, भर लग्नात गोळ्या झाडून संपवलं

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रणबीर बरोबर साऊथची सुपस्टार रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळालं आहे. अॅडवान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाची ५ लाखाहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. प्रदर्शनाअगोदरच या चित्रपटाने १४ कोटींची कमाई केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sandeep reddy vanga reacts to rumors of mahesh babu rejecting animal before ranbir kapoor dpj

First published on: 29-11-2023 at 14:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×