‘आशिकी’ या १९९० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील प्रेमकथा प्रेक्षकांना फारच भावली होती. २०१३ साली या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच ‘आशिकी २’ प्रदर्शित करण्यात आला. आता याच चित्रपटाच्या तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. आशिकी ३’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. कार्तिकबरोबर यामध्ये आता त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबरोबर दिसणार आहे. कार्तिकसह ‘आशिकी ३’ चित्रपटात नायिकेची भूमिका कोण साकारणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची नावेही पुढे आली होती. दीपिका पदुकोण, क्रिती सेनॉन किंवा श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती यात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना दिसणार होती मात्र आता सारा अली खान झळकणार अशी चर्चा आहे. सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचा शाही विवाह सोहळा पाहता येणार; ‘या’ ओटीटी प्लँटफॉर्मने दिले संकेत कार्तिक सारा याआधी लव्ह आजकल २ चित्रपटात एकत्र दिसले होते. हा चित्रपट फारसा चालला नाही. या चित्रपटानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आशिकी ३ निर्मात्यांना हा चित्रपट रोमँटिक बनवायचा आहे म्हणून निर्मात्यांना अशीच एक जोडी अपेक्षित आहे. या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी दिसणार अशी ही चर्चा सुरु आहे. टी- सीरिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निर्माते भूषण कुमार यांनी ‘आशिकी ३’ची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आहे. मागच्या वर्षी त्याचा ‘भूलभुलैय्या २’ हा चित्रपट खूप चालला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. लवकरच त्याचा शेहजादा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.