scorecardresearch

शाहरुख खानमुळे तब्बल आठवेळा थुंकण्याच्या सीनचा द्यावा लागलेला रिटेक; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला ‘मैं हू ना’तील ‘त्या’ सीनचा किस्सा

शाहरुख खानचा मैं हू ना चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता

main-hoon-na
मैं हू ना चित्रपटामधील थुंकण्याचा सीन करताना सतीश शाहांना शाहरुखने दिला होता त्रास (संग्रहित छायाचित्र)

अभिनेता सतीश शाह दीर्घकाळापासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटात काम केले आहे. जुन्या गोष्टींची आठवण करून देत सतीश शाह यांनी नुकताच शाहरुख खानशी संबंधित एक किस्सा सांगितला. सतीश शाह यांनी शाहरुख खानसोबत ‘मैं हूं ना’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात सतीश शाह यांनी एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. ज्याला बोलताना थुंकायची सवय होती. शाह यांनी हे पात्र उत्तमरित्या साकारले होते. मात्र, शुटींगदरम्यान त्यांना शाहरुख खानेने किती त्रास दिला याबाबत शाहांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा- सारा अली खानबरोबर शूटींग केल्यावर चित्रांगदाने थेट सैफला केला मेसेज; म्हणाली, “तुझी मुलगी..”

अलीकडेच, सतीश शाहा यांनी त्यांच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, प्रत्येक शॉट सुरू होण्यापूर्वी ते पाणी प्यायचे. तोंडाभोवती पाणी ठेवायचे. जेणेकरून तो शब्द उच्चारताच फवारणीसारखे पाणी बाहेर पडत राहिल. सतीश शाहच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांना शाहरुखला शिव्या देण्याचा सीन करायचा होता तेव्हा शाहरुखने त्याला खूप त्रास दिला. मी खूप मेहनत करायचो, पण शाहरुख हसत हसत तो सीन खराब करायचा.

हेही वाचा- Adipurush film : “मंत्रो से बढके…” ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित; प्रभासच्याबरोबरीने झळकला मराठमोळा अभिनेता

शाहरुखच्या हसण्यानंतर, त्यांना पुन्हा पुन्हा रिटेक घ्यावे लागले आणि त्याने फक्त एका सीनसाठी ८ रिटेक घेतले होते. त्यामुळे त्यांना तो अभिनय करताना खूप त्रास झाला. शाहांनी पुढे खुलासा केला की आठव्या शॉटनंतर शाहरुख हसला, पण तो इन्सर्ट शॉटने दुरुस्त करण्यात आला. या चित्रपटासाठी शाह यांना दोन पात्रांची ऑफर देण्यात आली होती. एक प्राचार्य आणि दुसरा थुंकणारा प्राध्यापक.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 10:53 IST

संबंधित बातम्या