‘गॅसलाइट’ चित्रपटात चित्रांगदा सिंग सारा अली खानच्या सावत्र आईच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटावर काम करत असताना चित्रांगदा सिंगने सैफ अली खानला एसएमएस करून साराबद्दल काही गोष्टी सांगितल्या. चित्रांगदाने सैफला पाठवलेल्या मेसेजमध्ये काय लिहिले होते ते सांगितले.

काय लिहिलं होतं मेसेजमध्ये

चित्रांगदाने सांगितले की, तिने सैफ अली खानला तिची मुलगी किती आश्चर्यकारक आहे हे सांगण्यासाठी मेसेज केला. सारासोबत काम करताना खूप आनंद होत असल्याचंही तिने सांगितलं. चित्रांगदाने सैफला पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिले होते. सारा खूप गोड आहे आणि तिच्यामध्ये अप्रतिम ऊर्जा देखील आहे.

हेही वाचा- “मला तिचा अभिमान…” बॉलिवूडमधील कंपूशाहीबद्दल भाष्य करणाऱ्या प्रियांका चोप्राचं प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं कौतुक

काय आहे चित्रपटाची कथा

गॅसलाईट चित्रपटात मीशा घरी परतते आणि त्यानंतर ती तिच्या वडिलांबद्दल जाणून घेऊ लागते. मीशाला असे वाटते की तिची सावत्र आई तिच्यापासून काहीतरी लपवत आहे, जी तिच्या वडिलांशी संबंधित आहे. चित्रांगदा आणि सारा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याआधी चित्रांगदा २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजार’ चित्रपटात सैफ अली खानबरोबर दिसली होती.

हेही वाचा- Video: शाहरुखची लेक करतेय बिग बींच्या नातवाला डेट? अगस्त्या नंदाने सर्वांसमोर केलं सुहानाला किस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रांगदाने २००५ मध्ये सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारों ख्वैशीं ऐसी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातून तिने केके मेनन आणि शायनी आहुजासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चित्रांगदा अखेरची अभिषेक बच्चनसोबत ‘बॉब बिस्वास’मध्ये दिसली होती. ‘गॅसलाइट’ हा रमेश तौरानी आणि अक्षय पुरी यांचा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे. हा चित्रपट OTT वर येत आहे जो ३१ मार्च २०२३ रोजी डिझनी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. या चित्रपटात विक्रांत मॅसी, अक्षय ओबेरॉय आणि राहुल देव देखील दिसणार आहेत.