Ed Sheeran-Shah Rukh Khan Video: हॉलीवूडचा सुप्रसिद्ध गायक एडवर्ड क्रिस्टोफर शीरन (Ed Sheeran) नुकताच भारतात आला होता. मुंबईत Ed Sheeranने दिलजीत दोसांझसह लाइव्ह परफॉर्म केला; ज्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहेत. या व्हिडीओमध्ये, Ed Sheeran पंजाबी गाणी गाताना दिसत आहे. अशातच शाहरुख खानच्या मन्नतमधील एक अनसीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात शाहरुख Ed Sheeranच्या सुरेल आवाजात दंग झालेला पाहायला मिळत आहे.

दरम्यान, Ed Sheeranचं भारतात स्वागत करण्यासाठी अनेक पार्टीचे आयोजन करण्यात होत्या. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्याची भेट घेतली. त्यानंतर Ed Sheeran शाहरुख खानच्या आलिशान मन्नत बंगल्यावर पोहोचला होता. यावेळी Ed Sheeranने परफॉर्म केला होता. ज्याचा अनसीन व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा – ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; शर्वरी जोग-हर्षद अतकरीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाले…

Ed Sheeranचा हा व्हिडीओ शाहरुख खानच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, Ed Sheeran गिटार वाजवत त्याचं लोकप्रिय गाणं ‘परफेक्ट’ गाताना दिसत आहे. तर बाजूला बसलेला शाहरुख Ed Sheeranच्या आवाजात दंग झालेला पाहायला मिळत आहे. सध्या Ed Sheeran व शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

याशिवाय Ed Sheeranसाठी गौरी खानने अलीकडेच उघडलेल्या नव्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला देखील बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. याचे फोटो गौरीने इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – कबीर, गुंजाच्या लग्नात गुंडांचा हल्ला अन् मग…; ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेचा ‘असा’ झाला शेवट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, Ed Sheeran भारतातील दौरा पूर्ण करून आज, १७ मार्चला लंडनला परतला आहे. जाता जाता त्याने पुन्हा एकदा भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.