बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान त्याचा आज ५७वा वाढदिवस आहे. शाहरुखच्या वाढदिवसाची त्याचे चाहते दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतात. वाढदिवसाच्या दिवशी त्याचे चाहते विविध प्रकारे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतात. दरवर्षी त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी जमते. यावर्षीही शाहरूख खानचे चाहते रात्री आपल्या लाडक्या शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या ‘मन्नत’ बंगल्या बाहेर चाहत्यांनी तुडुंब गर्दी असून होती.

आणखी वाचा : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा तीन वर्षांनी मायदेशी परतण्यामागे ‘ही’ कारणं

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले

काल रात्री चाहत्यांनी शाहरुखासाठी फुलं, भेटवस्तू आणल्या होत्या. तर काहीजण शाहरुखचे पोस्टर घेऊन तिथे पोहोचले होते. काहींनी फटाकेही फोडले. आपल्या फॅन्सच्या प्रेमाखातर शाहरूख खानही रात्री त्याच्या बाल्कनीत आला आणि त्याने चाहत्यांना अभिवादन केलं. तेव्हा त्याचा लहान मुलगा अबरामही त्याच्यासोबत होता. यावेळी शाहरुखने त्याची सिग्नेचर पोज देत चाहत्यांचे प्रेम स्वीकारले.

शाहरुख खान चार दशकांहून अधिक काळ कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. शाहरूख ने १९८९ मध्ये ‘दिवाना’ चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कल हो ना हो’, ‘स्वदेस’, ‘ओम शांती ओम’, ‘चख दे इंडिया’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांना भुरळ घातली. नुकताच तो अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला.

हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

दरम्यान शाहरुख खानाच्या आगामी चित्रपटांची यादीही मोठी आहे. तो पुढील वर्षी ‘जवान’, ‘पठाण’, ‘डंकी’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुखबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. तर त्याच्या अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटात विजय सेतुपती आणि नयनतारा हे आघाडीचे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर शाहरूख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करणार आहेत. या चित्रपटात त्याच्याबरोबर तापसी पन्नू, बोमन इराणी हे महत्वपूर्ण भूमिका सकारणार आहेत.