बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या लग्नाचा आज ३१ वा वाढदिवस. शाहरुखने अनेकदा गौरी आणि त्याची लव्हस्टोरी विस्ताराने सांगितली आहे. आज बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये गणली जाणारे हे दोघं १९८४ मध्ये एका मित्राच्या पार्टीमध्ये पहिल्यांदा एकामेकांना भेटले होते. त्यावेळी ते दोघंही फक्त १८ वर्षांचे होते. त्यानंतर काही काळाने दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. शाहरुख खानने २५ ऑक्टोबर १९९१ मध्ये लग्न केलं. आज या दोघांच्या लग्नाला ३१ वर्षं झाली आहेत. पण एकदा शाहरुखने चक्क गौरीला “मला तुझा भाऊच समज” असं म्हटलं होतं.

शाहरुख खान आणि गौरी यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर काही वर्षांनी एकमेकांशी लग्न केलं. पण एकदा शाहरुखने गौरी खानचा भाऊ होण्याचा प्रयत्न केला होता. शाहरुख खानने एका फरहान अख्तरसह एका शोमध्ये हजेरी लावलं होतं. याबद्दल त्याने याच चॅट शोमध्ये सांगितलं होतं. या शोमध्ये शाहरुख खानने सांगितलं होतं की त्याने गौरी खानला लग्नाच्या आधीच असं सांगितलं होतं. त्यावेळी तो पहिल्यांदाच गौरीला त्याच्या मित्राच्या पार्टीमध्ये भेटला होता आणि तिला पाहून खूप इम्प्रेस झाला होता. त्यावेळी त्याने तिला, “तू मला तुझा भाऊच समज” असं म्हटलं होतं.

आणखी वाचा- “साडी तू स्वतः नेसलीस का?” लेकीचा ग्लॅमरस लूक पाहून शाहरुख खानने विचारला प्रश्न, सुहाना म्हणाली…

सप्टेंबर २०२२ मध्ये, जेव्हा गौरी खानने करण जोहर चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये सहभागी झाल्यामुळे ती चर्चेत होती. शोमध्ये, जेव्हा होस्ट करण जोहरने गौरीला शाहरुख खानला कॉल करण्यास सांगितलं होतं, ज्यामुळे तिला ६ गुण मिळणार होते. किंग खानने आपल्या पत्नीला निराश केलं नव्हतं आणि पत्नीने त्याला फोन केला तेव्हा काही सेकंदातच त्याने कॉल रिसिव्ह केला. जेव्हा करण जोहरने सांगितले की शाहरुखने गौरी खानला ६ गुण मिळविण्यात मदत केली तेव्हा किंग खानने खूपच हटके उत्तर दिलं होतं आणि म्हणाला, “हे बघ गौरी, माझ्याबरोबर राहिलीस तर तुला असेच चांगले गुण कायम मिळत राहतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आणि त्याची पत्नी हे दोघे आदर्श जोडपे मानले जातात. शाहरुख-गौरी गेली ३१ वर्ष सुखाचा संसार करत आहेत. १९९१मध्ये शाहरुख-गौरीने लग्न केलं होतं. आता त्यांना आर्यन, सुहाना, अबराम अशी तीन मुलं आहे.