दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री श्रिया सरन सध्या चर्चेत आहे. श्रियाच्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. नुकत्याच ‘शोटाईम’ या वेब सीरिजमध्ये इमरान हाश्मीबरोबर झळकलेल्या या अभिनेत्रीने ‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. त्यादरम्यान श्रियाच्या एका वयोवृद्ध चाहतीने पापाराझींना चांगलेच सुनावले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

१७ एप्रिलला श्रिया सरन ‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचली होती. पापाराझींसाठी पोज देताना श्रियाची वृद्ध चाहती तिथे आली. श्रियाने त्यांना सांगितलं की, या पापाराझींना जरा समजवा. तेवढ्यात श्रियाची वृद्ध चाहती पापाराझींना ओरडली आणि म्हणाली, “बस करा आता, किती गरम होतंय बिचाऱ्या मुलीला. एकतर तिने असे कपडे घातलेत आणि एवढी गरमी होतेय. ती एसीमध्ये राहणारी मुलगी आहे. तिला अशा कपड्यांमुळे आणखी गरम होत असणार”, असं बोलून वृद्ध चाहतीने श्रियाला तिथून जायला सांगितलं.

हेही वाचा… ठरलं तर मग: अर्जुन आणि सायलीला साक्षीविरोधात सापडला ‘हा’ पुरावा; लवकरच चैतन्यसमोर येणार सत्य?

यावर श्रियाने प्रेमाने स्मितहास्य केलं आणि पापाराझींना म्हणाली, “बघितलं, असं बोलायचं असतं.” यावर पापाराझी श्रियाला म्हणाला, “खूप प्रेम मिळतंय तुम्हाला.”

श्रिया आणि तिच्या चाहतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ही आंटी आहे तरी कोण?” कमेंट सेक्शनमध्ये असा प्रश्न अनेकांनी विचारला. “आजी बस करा आता”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. “काही दिवसांनंतर ही आंटी एका चित्रपटात मुख्य भूमिकेत तरी दिसेल नाही तर बिग बॉसमध्ये तरी दिसेल”, अशी कमेंट दुसऱ्या नेटकऱ्याने केली.

हेही वाचा… “तात्या विंचू पुन्हा येतोय!”, आदिनाथ कोठारेने शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर, अभिनेता म्हणाला…

बुधवारी संध्याकाळी ‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांसाठी मुंबईत स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. चित्रपटाची लीड स्टार विद्या बालन या कार्यक्रमात सुंदर काळ्या आणि लाल गाऊनमध्ये दिसली. या चित्रपटात विद्या बालनसह प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ, सेंधिल राममूर्ती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. १९ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा… “आई तू लग्न कधी करणार?”, अरहान खानने मलायका अरोराला प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली…

‘भुल भुलैया ३’ मधील विद्या बालनचा सहकलाकार कार्तिक आर्यनदेखील ‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजर होता. या वृद्ध चाहतीने कार्तिकबरोबरही फोटोज काढले.