बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे ज्याची चाहते फारच आतुरतेने वाट बघत होते. या टीझरच्या आधी चित्रपटाचे पोस्टर एका हटके पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले होते. १३००० फूट उंचीवर हवेत या चित्रपटाचे पोस्टर फडकवत याच्या टीझरची घोषणाही करण्यात आली होती. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. पोस्टर लाँच करण्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम दुबईमध्ये स्कायडायव्हिंग करताना पाहायला मिळाली.

नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या छोट्याश्या टीझरमध्ये बराच थरार अनुभवायला मिळत आहे. एक विमान हायजॅक होतं अन् मग त्यांच्या बचावाच्या मोहिमेवर सिद्धार्थ मल्होत्राला पाठवण्यात येतं जो भारतीय सैन्यातील एक अधिकारी दाखवला आहे. असा अंदाज टीझर पाहून लावला जात आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

आणखी वाचा : ‘बाहुबली’मधील कटप्पाच्या भूमिकेसाठी ‘हा’ बॉलिवूड अभिनेता होता पहिली पसंती, पण…; नेमका किस्सा जाणून घ्या

चित्रपटाच्या कथेबद्दल फारशी माहिती समोर आलेली नसून केवळ एका रेस्क्यू मिशनवर हा चित्रपट बेतला असल्याचं याच्या टीझरवरुन स्पष्ट होत आहे. सिद्धार्थबरोबरच या चित्रपटात राशी खन्ना व दिशा पटानी या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचीही एक छोटीशी झलक या टीझरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना हा टीझर प्रचंड आवडला आहे.

अखेर ३ वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्यंतरी हा चित्रपट २०२३ च्या अखेरीस प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं होतं पण पुन्हा तो लांबणीवर पडला. अशारीतीने सतत लांबणीवर पडणारा करण जोहर निर्मित, पुष्कर ओझा दिग्दर्शित ‘योद्धा’ हा १५ मार्च २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थला पुन्हा एकदा आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.