Sonakshi Sinha Pregnancy Rumours : सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. दोघे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा एकमेकांबरोबरचे गमतीशीर व्हिडीओ ते शेअर करीत असतात. अशातच आता ही जोडी लवकरच आई-बाबा होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने अलीकडेच ती गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावरून शेअर केली. त्यानंतर सोशल मीडियावर कतरिना व विकी कौशल यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच आता विकी-कतरिनानंतर सोनाक्षी व झहीरदेखील आई-बाबा होणार आहेत, अशी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं.
सोनाक्षी सिन्हा देणार गुड न्यूज?
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी नुकतीच १४ ऑक्टोबर रोजी मुंबईत एका कार्यक्रमात पारंपरिक अंदाजात हजेरी लावली. यावेळी सोनाक्षीनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यावर तिनं लाल टिकली व भांगेत कुंकूसुद्धा भरल्याचं दिसतं. या वेळचे त्यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये सोनाक्षी फोटो काढताना पोटावर हात ठेवताना दिसते. सोनाक्षीला पाहून अनेकांनी सोनाक्षी गरोदर आहे का अशा कमेंट्स केल्या आहेत.
नेटकरी काय म्हणाले?
वीरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने ‘प्रेग्नन्सी ग्लो’, एकाने ‘ही गरोदर आहे का’?, ‘बेबी ऑन दी वे’, ‘ओह ती प्रेग्नंट आहे’, ‘ती गरोदर असल्यासारखं वाटतंय’, ‘ती गरोदर आहे’ अशा कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.
सोनाक्षी सिन्हाचा व्हिडीओ पाहून अनेकांनी ती गरोदर असल्याची शक्यता वर्तवली असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, अद्याप सोनाक्षी व झहीर यांनी ती गरोदर आहे की नाही याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, अलीकडे अभिनेत्री कतरिना कैफ, परिणीती चोप्रा यांनी त्या गरोदर असल्याची बातमी शेअर केली. यापूर्वीसुद्धा कतरिना व कियारा यांच्याबद्दल अशा चर्चा केल्या गेल्या होत्या आणि त्या खऱ्यासुद्धा ठरल्या. त्यामुळे आता सोनाक्षीबद्दलची चर्चा खरी ठरतेय की नाही याचं उत्तर येत्या काळातच मिळेल.