शाहरुख खानची लेक आणि ‘द आर्चीज’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी सुहान खान ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रश्नमंजुषा शो मध्ये सामील जाली होती. मात्र तिला एका फजितीला सामोरे जावे लागले आहे. शाहरुख खानशी संबंधित एक प्रश्न तिला विचारण्यात आला होता. मात्र सुहाना खानने या प्रश्नाचे दिलेले उत्तर चुकले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सुहाना खानची थट्टा उडवली. तसेच ‘द आर्चीज’मधील तिचा सहकलाकार वेदांग रैनानेही उत्तर चुकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. अमिताभ बच्चन यावेळी म्हणाले की, बापाने काय काय मिळवलं आहे, हे मुलीला माहीतच नाही. सुहान खान केबीसीमध्ये सहभागी झालेला भाग लवकरच प्रदर्शित होईल. यावेळी सुहानासह दिग्दर्शक झोया अख्तर आणि ‘द आर्चीज’मधील कलाकारही कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाले होते.

कोणत्या प्रश्नाचे उत्तर चुकले?

अमिताभ बच्चन यांनी सुपर संदुक राऊंडमधये शाहरुखशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता, “शाहरूख खानला पुढीलपैकी कोणता पुरस्कार अद्याप मिळाला नाही?” यावर पर्याय होते अ) पद्मश्री पुरस्कार, ब) लीजन ऑफ ऑनर, क) एटोइल डी’ओर आणि ड) व्होल्पी कप. सुहानाने अ) पद्मश्री असा पर्याय निवडला. मात्र तिने दिलेले उत्तर चुकीचे होते. अचूक उत्तर आहे, ड) व्होल्पी कप हा पुरस्कार अद्याप शाहरुखला मिळालेला नाही.

Harassment Case Brijbhushan Sharan Singh
“मी गुन्हा केलाच नाही, तर गुन्ह्याची कबुली…”; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपावर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया
Swati Maliwal Case
Swati Maliwal Case : “हा माझ्या मुलावर अन्याय आहे, तो गेली १५ वर्ष…”; बिभव कुमार यांच्या अटकेनंतर वडिलांची प्रतिक्रिया
Mihir Kotecha, Sanjay Patil,
मुंबई विकासावर चर्चा करण्याचे कोटेचा यांचे संजय पाटील यांना आव्हान
AJit Pawar vs Supriya Sule
“मी त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी कारकीर्द…”
Nitesh Rane, High Court, Nitesh Rane latest news,
वडिलांच्या प्रचारात व्यग्र असल्याने उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ द्या, नितेश राणेंची उच्च न्यायालयात मागणी
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
Shivajirao Adharao Patil,
‘डॉ. कोल्हे जरा विकासाचेही बोला…’, शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा टोला

हे वाचा >> अगस्त्य नंदाच्या मामा-मामीने केला ‘द आर्चीज’चा रिव्ह्यू; अभिषेकला आठवले जुने दिवस, तर ऐश्वर्या राय म्हणाली…

शाहरुखने काय सांगून पाठवलं?

अमिताभ बच्चन यांनी सुहानाला विचारलं की, शाहरुखने तुला काही सांगून पाठवलं की नाही? यावर सुहाना म्हणाली की, त्यांनी तुम्हाला आठवण करून द्यायला सांगितले होते. तुम्ही माझ्या वडिलांच्या वडिलांचे पात्र साकारलेले आहे. त्यामुळे मला तुम्ही सोपे प्रश्न विचारा. अमिताभ बच्चन यांनी कभी खुशी, कभी गम या चित्रपटात शाहरूख खान यांच्या वडिलांची भूमिका निभावली होती.

अमिताभ बच्चन यांची मजेशीर प्रतिक्रिया

सुहानाचे उत्तर चुकल्यामुळे तिची चांगलीच फजिती झाली. द आर्चीजच्या वेदांग रैनानेही आश्चर्य व्यक्त केलं. यावर सुहानाची थट्टा करताना अमिताभ म्हणाले, “बापाने सुहानाला सांगितलं की, तुझ्या समोर जो व्यक्ती बसला आहे, त्याने तुझ्या वडिलांच्या वडिलांचे पात्र निभावलेले आहे. तर जरा सोपे प्रश्न विचारा. आता मी एवढा सोपा प्रश्न विचारला तरी त्याचे तू (सुहाना) उत्तर चुकीचे दिले.”

एवढेच नाही तर अमिताभ बच्चन सुहानाला म्हणाले की, चित्रपटसृष्टीत येण्याआधी वडिलांनी (शाहरुख खान) तुला काय सल्ला दिला होता. त्यावर सुहानाने उत्तर दिले की, चुकीचे उत्तर दिल्यामुळे मी थोडी खिन्न झाले आहे. पण तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देते. माझ्या वडिलांनी चित्रपटात येण्यापूर्वी मला सांगितले की, नेहमी दोन आवाज ऐक. एक म्हणजे दिग्दर्शकाचा आणि दुसरा तुझ्या मनाचा. बाकी जे व्हायचे ते होईल.

आणखी वाचा >> जगप्रसिद्ध आर्ची या कॉमिक्स पात्राने दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात अमेरिकेतील नैतिक समाजाची पायाभरणी कशी केली?

सुहानाचा द आर्चीज प्रदर्शित

सुहाना खानने नुकतेच झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटात काम केले आहे. सुहानासह या चित्रपटात मिहीर आहुजा, अगस्त्य नंदा, खुशी कपूर, वेदांग रैना आणि युवराज मेंदा असे इतर कलाकार आहेत. झोया अख्तरचा ‘द आर्चीज’ हा सिनेमा सदाबहार ‘आर्ची’ या कॉमिक्सचे भारतीय चित्रपटातील रूपांतर आहे. १९४० च्या दशकापासून ते आजपर्यंत आर्ची हे कॉमिक्स कॅरेक्टर विशेष लोकप्रिय आहे. १९४१ च्या डिसेंबर महिन्यात आर्ची प्रथम मासिकात झळकला. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. झोया अख्तर यांच्या चित्रपटात मैत्री, स्वातंत्र्य, प्रेम, हृदय तुटणे आणि बंडखोरी अशा भावनांची सरमिसळ आहे.