scorecardresearch

Premium

अगस्त्य नंदाच्या मामा-मामीने केला ‘द आर्चीज’चा रिव्ह्यू; अभिषेकला आठवले जुने दिवस, तर ऐश्वर्या राय म्हणाली…

‘द आर्चीज’ चित्रपट पाहून अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चनने दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत

Aishwarya Rai Bachchan reviews Agastya Nanda starrer The Archies
अगस्त्य नंदाचे मामा-मामी चित्रपट पाहून काय म्हणाले? जाणून घ्या

झोया अख्तरचा ‘द आर्चीज’ चित्रपट ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. अगस्त्य नंदा, सुहाना खान, खुशी कपूर, वेदांग रैना, मिहीर आहुजा, अदिती सैगल आणि युवराज मेंदा ही या चित्रपटातील स्टारकास्ट आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका भव्य प्रीमियरचे आयोजन केले होते. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, कतरिना कैफ आणि रणवीर सिंह यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

चित्रपट पाहिल्यानंतर सेलिब्रिटींनी या चित्रपटाबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या. चित्रपट पाहिल्यानंतर अगस्त्य नंदाचा मामा अभिषेक बच्चन म्हणाला, “या चित्रपटाने आम्हाला त्या काळात परत नेलं. आम्ही सर्वजण आर्चीज वाचत मोठे झालो आहोत आणि या चित्रपटाने आम्हाला आमच्या तारुण्यात परत नेलं.” तर, अगस्त्यची मामी ऐश्वर्या रायनेही संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. “हा चित्रपट खूप छान होता, संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन,” असं ती म्हणाली. यावेळी अगस्त्यला सपोर्ट करण्यासाठी जया बच्चन, नव्या नवेली नंदा, श्वेता बच्चन, आराध्या बच्चन व निखिल नंदा उपस्थित होते.

Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Vijay Sethupati Co-actress Dies As Drunk Son Beats Her Kadaisi Vivasayi actor Kasiammal Son Arrested For Killing Mother at 74
विजय सेतुपतीच्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलाने केलेल्या मारहाणीत मृत्यू; मद्यधुंद लेकाला पोलिसांकडून अटक
Aishwarya Rai wishes happy birthday abhishek bachchan shared photos instagram
ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांना दिला पूर्णविराम; अभिषेक बच्चनच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोने वेधलं लक्ष

सासरेबुवा जेव्हा जावयाच्या खांद्यावर हात ठेवून पोज देतात; अमिताभ बच्चन व निखिल नंदा यांचे फोटो व्हायरल

सबा आझादसह हृतिक रोशनने या कार्यक्रमात हजेरी लावली. तो म्हणाला, “खूप छान सिनेमा. खूप गोड चित्रपट होता. त्यातला प्रामाणिकपणा, संगीत, डान्स सगळं खूप चांगलं होतं. मी नाचत होतो. मला चित्रपट खूप आवडला.” कतरिना कैफने झोया अख्तरचं कौतुक केलं. “मला वाटतं की आम्ही सर्व झोया अख्तरचे सर्वात मोठे चाहते आहोत. ती एक अष्टपैलू दिग्दर्शक आहे. ती जे काम करते ते उत्तम करते,” असं कतरिना कैफ म्हणाली.

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी

करण जोहरने या चित्रपटातील सर्व कलाकारांचे कौतुक केले आणि म्हणाला, “आम्हाला झोया अख्तरच्या चित्रपटातून जे काही पहायचं असतं, ते सगळं या चित्रपटात आहे. यातील सातही मुलांची खूप चांगलं काम केलं आहे. प्रत्येकाने उत्तम कामगिरी केली आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aishwarya rai bachchan abhishek bachchan reviews agastya nanda starrer the archies hrc

First published on: 11-12-2023 at 09:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×