Sunjay Kapurs wife Priya Sachdevs post goes viral: प्रसिद्ध उद्योजक संजय कपूर यांचे १२ जूनला अकाली निधन झाले. संजय कपूर हा अभिनेत्री करीश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती आहे.
२००३ मध्ये अभिनेत्री करीश्मा कपूर व संजय कपूर यांनी लग्नगाठ बांधली होती, त्यांना दोन मुलेदेखील आहेत. मात्र, लग्नाच्या दहा वर्षांनंतर त्यांनी २०१४ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता.
प्रिया सचदेवची जुनी पोस्ट व्हायरल
करीश्मा कपूरबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांनी मॉडल व अभिनेत्री प्रिया सचदेवशी २०१७ मध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आहे. प्रिया सचदेव सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती अनेकदा तिच्या आयुष्यातील खास क्षणांबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर करत असते. फोटो, व्हिडीओ या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता प्रियाची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संजय व तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रियाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. आता संजय कपूरच्या निधनानंतर ही पोस्ट व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये प्रियाने लिहिले होते, “माझ्या हँडसम नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तुझ्याबरोबरचे आयुष्य अनेक भावनांनी भरलेले आहे. जिथे हसू, आनंद, उत्साह आणि वेडेपणा आहे. तू मला पूर्ण केले आहेस. तू कोणत्याही परिस्थितीत मला साथ देतोस आणि आपल्यासाठी ज्या गोष्टी करतोस, त्यासाठी मनापासून धन्यवाद”, अशा आशयाची पोस्ट करत प्रिया सचदेवने संजय कपूरप्रति तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
आता या पोस्टवर नेटकरी संजय कपूरच्या निधनानंतर कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेटकरी प्रियाला सांत्वना देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी संजयच्या आत्म्यास शांती लाभो असे लिहिले आहे, तर एकाने लिहिले, “प्रिया तू खंबीर राहा. संजय नेहमीच तुझ्याबरोबर आहे; तर आणखी एकाने लिहिले आहे, “संजय खूप चांगली व्यक्ती होती, त्याला भेटण्याचे माझे स्वप्न अपूर्णच राहिले.”
प्रिया सचदेवचे करीश्मा व संजयच्या मुलांशी समायरा व कियान यांच्याबरोबर चांगले नाते असल्याचे पाहायला मिळते. ती अनेकदा समायरा आणि कियानबरोबर तिचा मुलगा अजरियासचे अनेक फोटो पोस्ट करत असते.