प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. त्याने स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं असून अभिनयात नाही तर निर्मिती क्षेत्रातून तो बॉलिवूड पदार्पण करत आहे. आता यानंतर प्रसिद्ध क्रिकेटक शिखर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात तो झळकणार आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यापाठोपाठ आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

आणखी वाचा : ‘दृश्यम २’ चित्रपटात तब्बू साकारणार ‘ही’ भूमिका, समोर आली पहिली झलक

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेश या चित्रपटातून लठ्ठ महिलांची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ज्या आपली स्वप्न पूर्ण करू इच्छितात. सतराम रमानी यांच्या दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात लठ्ठ महिलांसंबंधी असलेल्या काही समस्या आणि गैरसमजांवर भाष्य केलं जाणार आहे. याच चित्रपटात शिखर धवन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘डबल एक्सएल’ हा चित्रपट बॉडी शेमिंगसारख्या विषयावर भाष्य करणारा आहे. ट्रेलरमध्ये दोन लठ्ठ महिला आहेत. त्यांना काही करुन आपआपल्या क्षेत्रात मोठं यश संपादन करायचे आहे. मात्र त्यांचे वाढणारे वजन आणि त्यावरुन त्यांच्यावर होणारी टीका याचा परिणाम त्यांच्यावर होत असल्यामुळे त्यांना अनेक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा विचार करून त्या एक निर्णय घेतात आणि त्यानुसार वाटचाल करू लागतात. त्याचप्रमाणे आजच्या तरुणांना काय हवे आहे, त्यांची मानसिकता काय आहे यावर हा चित्रपट भाष्य करताना दिसतो.

हेही वाचा : सोनाक्षी सिन्हाने केली बहुप्रतीक्षित ‘निकिता रॉय’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा एक कॉमेडी चित्रपट असून तो ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी आणि हुमाच्या त्यांच्यासोबत अभिनेता झहीर इक्बाल आणि महत राधवेंद्र दिसणार आहेत. या दोन कलाकारांशिवाय या चित्रपटात क्रिकेटर शिखर धवनही दिसणार आहे. शिखर या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे.