Premium

उर्वशी रौतेला साकारणार ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा बायोपिक; व्हिडीओ शेअर करत केली घोषणा

उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्रीचा बायोपिक साकारणार आहे.

urvashi-rautela
उर्वशी रौतेला साकारणार 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा बायोपिक

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात बायोपिक चित्रपट बनत आहेत. अनेक कलाकारांनी या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता या कलाकारांच्या यादीत अभिनेत्री उर्वशी रौतेलाचाही समावेश होणार आहे. उवर्शी लवकरच ज्येष्ठ अभिनेत्री परवीन बाबीवर बनणाऱ्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. उवर्शीने पोस्टमध्ये लिहंल आहे, वसीम एस खान यांचा चित्रपट. पुढे उर्वशीने दोन परिच्छेदांसह परवीन बाबींचे नाव ठळक अक्षरात लिहिले आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की हा चित्रपट अभिनेत्रीच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगेल. तिचे सोनेरी क्षण पडद्यावर सादर करणार आहे. उर्वशीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ ‘बॉलिवूडमध्ये अयशस्वी झाली पण मला परवीन बाबीचा अभिमान वाटेल.’ ओम नमः शिवाय. खरंच हा नवा प्रवास जादुई आहे. उर्वशी रौतेलाला परवीन बाबींच्या बायोपिकमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा- …जेव्हा मनोज बाजपेयींच्या पत्नीला ‘द फॅमिली मॅन’ वाटली होती मालिका; अभिनेत्याला दिलेला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

उर्वशीने या पोस्टमध्ये या चित्रपटाच्या स्क्रिप्टशी संबंधित पहिले पानही शेअर केले आहे. ज्यामध्ये परवीन बाबीचे आई-वडील आणि त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा प्रवास पाहायला मिळत आहे. असं म्हणतात परबीन बाबींचा जन्म तिच्या आई-वडिलांच्या लग्नानंतर १४ वर्षांनी झाला होता, त्यामुळे त्या आई-वडिलांच्या लाडक्या होत्या.

परवीन यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९७२ मध्ये मॉडेलिंगपासून केली होती. त्याचवेळी त्यांनी ‘चरित्र’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. चित्रपटांबरोबरच परवीन यांचे खासगी आयूष्यही चांगलेच चर्चेत होते. त्यांचे नाव अनेक सुपरस्टार्ससोबत जोडले गेले. २२ जानेवारी २००५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. असं म्हणतात जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्याबरोबर कोणीही नव्हते. आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये परवीन बाबी मृतअवस्थेत आढळून आल्या होत्या.

हेही वाचा- “तुझं तोंड…”; बिग बजेट चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याच्या नवाजुद्दीनच्या वक्तव्याची प्रसिद्ध अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला…

उर्वशी रौतेलाविषयी बोलायचे झाले तर, नुकतीच तिच्या नवीन घराविषयी जोरदार चर्चा रंगली होती. उर्वशीने मुंबईत १९० कोटींचे घर खरेदी केले आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, तिच्या आईने याबाबत खुलासा करत या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 16:40 IST
Next Story
“तुझं तोंड…”; बिग बजेट चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याच्या नवाजुद्दीनच्या वक्तव्याची प्रसिद्ध अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला…