Chhaava Movie : विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. विकी कौशलसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरने प्रदर्शित झाल्यावर रेकॉर्डब्रेकिंग व्ह्यूज मिळवले आहे. याशिवाय संपूर्ण देशभरात हा ट्रेलर पहिल्या स्थानावर ट्रेंड करत असल्याची पोस्ट सुद्धा निर्मात्यांकडून शेअर करण्यात आली होती. यावरुन ‘छावा’ सिनेमाची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे याची प्रचिती मिळते.

premachi goshta fame actress husband got important role in chhaava movie
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीचा नवरा ‘छावा’मध्ये झळकणार, म्युझिक लॉन्चला जोडीने उपस्थिती, पाहा फोटो
how kapil sharma lose weight by doing midnight exercise
कपिल शर्मा वजन कमी करण्यासाठी मध्यरात्री २ वाजता…,…
Akshay Kumar Teleprompter Actor
अक्षय कुमार चित्रपटातील संवाद टेलीप्रॉम्प्टरवर वाचतो, ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने केले मान्य; म्हणाला…
genelia and riteish deshmukh 23 years of togetherness
“बायको, २३ वर्षे झाली…”, जिनिलीया व रितेश देशमुख ‘व्हॅलेंटाईन डे’ १२ फेब्रुवारीला का साजरा करतात? ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
Vicky Kaushal fee for films
‘छावा’ सिनेमाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कमावले तब्बल…; ७२ तासांमध्ये ‘इतक्या’ लाख तिकिटांची विक्री, निर्माते म्हणाले…
jaya bachchan urges government to have mercy on industry
“चित्रपट उद्योग ‘नष्ट’ करण्याचा प्रयत्न…”, जया बच्चन यांनी सरकारला केलं ‘हे’ आवाहन, अर्थमंत्र्यांना म्हणाल्या…
Aamir Khan on Offensive Comedy
रणवीर अलाहाबादियाच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आमिर खानचा जुना व्हिडीओ चर्चेत; अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर दिली होती प्रतिक्रिया
Arjun Kapoor Fan shouting Malaika at Mere Husband Ki Biwi promotion video viral
Video: अर्जुन कपूरला पाहताच चाहत्याने घेतलं मलायकाचं नाव, अभिनेता वैतागून…; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Bhagyashree
“मी अनेक अभिनेत्रींना रडवले…”, लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले, “भाग्यश्रीला…”

विकी कौशलचा रुद्रावतार प्रेक्षकांना ‘छावा’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. भारदस्त संवाद, ऐतिहासिक लढाया या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असा हा ट्रेलर आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘छावा’मध्ये प्रेक्षकांना एका मराठी अभिनेत्याची झलक सुद्धा मिळत आहे. या अभिनेत्याचं नाव आहे संतोष जुवेकर. अभिनेता संतोष जुवेकर ‘छावा’च्या निमित्ताने बॉलीवूड स्टार विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर संतोषने एक खास पोस्ट शेअर केली होती. “फायनली माझं शूट संपलं. पण, शूटिंगचे दिवस आठवणीत राहतील कारण, उत्तम कलाकारांची आणि टीमची साथ असेल, तर काम बहारदार रंगतं आणि मनही कामात रमतं. या क्लिपमधून तुम्हाला आम्ही सेटवर केलेल्या मस्तीची कल्पना येईल. पण, मला खात्री आहे सिनेमाचा पहिला ट्रेलर येईल तेव्हा आम्ही काम करताना काय तोडफोड मेहनत केलीये याची सुद्धा कल्पना येईल.” असं त्याने आधीच पोस्ट शेअर करत म्हटलं होतं आणि अपेक्षेप्रमाणे ‘छावा’चा ट्रेलर सर्वत्र तुफान हिट ठरला आहे.

Chhaava Movie
विकी कौशलच्या सिनेमात झळकणार मराठी अभिनेता ( Chhaava Movie )

संतोष जुवेकर आजवर मराठी मालिका, चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘वादळवाट’, ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ अशा मालिकांमध्ये त्याने काम केलेलं आहे. याशिवाय अभिनेत्याने ‘झेंडा’, ‘सनई चौघडे’, ‘मोरया’, ‘रिंगा रिंगा’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader