बॉलिवूडमधील जोड्या कायमच चर्चेत असतात. रितेश जिनिलिया, रणबीर आलिया, सैफ करीना, या जोड्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असते. सैफ करीना हे जोडपे सोशल मीडियावर सक्रिय असते. एकमेकांवरचे प्रेम ते सोशल मीडिया, मुलाखतींमधून व्यक्त करत असतात. सैफ अली खानने नुकतीच इटाईम्सला मुलाखतीत आपल्या कुतंबाविषयी माहिती दिली.

या मुलाखतीत तो आपल्या खासगी आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त झाला आहे. तो म्हणाला की ‘माझा धाकटा मुलगा जहांगीर करीनाच्या खूप जवळ आहे. खरे तर आम्ही सगळेच तिच्याजवळ आहोत मात्र जहांगीर जास्त जवळ आहे. तो खूप गोड मुलगा आहे. आमच्या घरात तो सगळीकडे फिरत असतो. माझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतो मात्र करीना आणि त्याचे बॉण्डिंग खूप छान आहे’.

Video: महेश मांजरेकरांच्या लेकीची ‘ती’ कृती पाहून नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव; पाहा नेमकं काय घडलं?

तैमूर जहांगीरबाबत बोलताना सैफ म्हणाला की ‘जहांगीरच्या जन्मानंतर तैमूर खरंच मोठा झाला आहे. त्या दोघांमध्ये चांगले बॉण्डिंग आहे. तैमूर आपल्या धाकट्या भावाच्याबाबतीत अत्यंत संयमशील आणि संरक्षणात्मकदेखील आहे’. दोघांच्यात भांडण झाल्यास तुम्ही कसे सोडवता या प्रश्नावर सैफने उत्तर दिले ‘खूप सोपे आहे. करिनाने जेहला जास्त वेळ दिला, तर मी तैमुरवर जास्त लक्ष देतो’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टशन’ चित्रपटापासून सैफ करीनाच्या प्रेमप्रकरणाला सुरवात झाली. प्रेमाचे रूपांतर खरे लग्नात झाले. १६ ऑक्टोबर २०१२ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. दोन मुलांचे ते आईवडील आहेत.करीना आणि सैफने २०१६ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला तैमूरला जन्म दिला तर मागच्या वर्षी फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला म्हणजे जहांगीरला जन्म दिला.