बॉलवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटातून शाहरुख खान जवळपास ४ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. पण या चित्रपटाचं पहिलंच गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद रंगला आहे. अनेक राजकीय नेत्यांबरोबरच बॉलिवूड कलाकारांनीही यावर टीका केली होती. त्यानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या गाण्यावर प्रतिक्रिया देताना टीका केली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी बॉलिवूड चित्रपटांतून दाखवल्या जाणाऱ्या अश्लीलतेवर ताशेरे ओढले आहेत. व्हिडीओमध्ये ‘पठाण’च्या ‘बेशरम रंग’ गाण्याच्या काही क्लिप्स आहेत. या व्हिडीओमध्ये दोन वेगवेगळ्या क्लिप्स मर्ज करण्यात आल्या आहेत. एकात गाण्याची काही दृश्यं आहेत तर दुसऱ्या क्लिपमध्ये एक किशोरवयीन मुलगी गाण्याचे आताच्या पीढीवर होत असलेल्या परिणामांवर चिंता व्यक्त करताना दिसत आहे.

आणखी वाचा- “वो मुझे भी नहीं छोड़ेंगे…” सुशांत सिंह राजपूतबरोबरचा फोटो पोस्ट करत विवेक अग्निहोत्री यांनी केलेलं ‘ते’ ट्वीट चर्चेत

हेही वाचा – अमेरिकन पॉर्नस्टारचा ‘पठाण’ मधील गाण्यावर बोल्ड डान्स; व्हिडीओ व्हायरल

विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी बॉलिवूड चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेन्टवर आक्षेप घेताना दिसत आहे. तसेच या सर्वच प्लॅटफॉर्मवर चांगला कंटेन्ट दाखवण्यात यावा अशी विनंती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं, “चेतावनी- हा व्हिडीओ बॉलिवूड विरोधी आहे. जर तुम्ही धर्मनिरपेक्ष असाल तर हा व्हिडीओ अजिबात पाहू नका.”

आणखी वाचा- सुप्रसिद्ध निर्मात्याने ‘द काश्मीर फाइल्स’शी केली ‘पठाण’ची तुलना, विवेक अग्नीहोत्री म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर युजर्स विवेक अग्निहोत्रींच्या या ट्वीटला समर्थन देताना दिसत आहेत. या पोस्टवर कमेंट करताना, “एका लहान मुलीने खूपच चांगल्या मुद्द्यावर बोलण्याचं धाडस केलं आहे.” अशा आशयाच्या कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे.