Amitabh Bachchan Doesnt Have Pulse On His Wrist: अमिताभ बच्चन यांचा ‘कुली’ हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पण, तुम्हाला माहितेय का, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता.

सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा एका जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मनगटावर नाडी नसल्याचा खुलासा केला होता. ‘कौन बनेगा करोडपती’च्या १३ व्या सीझनच्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले होते, “माझ्या मनगटावर नाडी नाही. १९८२ साली ‘कुली’ चित्रपटाचे शूटिंग करताना अपघात झाला होता, त्यावेळी मला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनगटावर कापले गेल्याने तेथील नाडी काम करण्याची बंद झाली. आता माझ्या मानेवर फक्त नाडी आहे.”

नाडी नसण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

नाडी तपासणीद्वारे हृदयाचे ठोके मोजता येतात. नाडी नसणे हे अत्यंत दुर्मीळ नाही. मात्र, एका मनगटात न दिसणारी किंवा नाडी नसणे हे सामान्य नाही, असे दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलचे अंतर्गत औषध विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंगला यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’बरोबर बोलताना सांगितले.

“आघात, शस्त्रक्रिया यांमुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, त्यामुळे काही व्यक्तींमध्ये नाडी आढळत नाही. बहुतेक निरोगी व्यक्तींमध्ये मनगटावर नाडी सहजपणे जाणवते. तथापि, दुखापतीमुळे किंवा धमन्यांशी संबंधित गुंतागुंतीमुळे काही लोकांमध्ये नाडी कमकुवत किंवा अनुपस्थित असू शकते. मनगटाच्या नाडीसाठी जबाबदार असलेल्या मुख्य धमनीवर शस्त्रक्रियेदरम्यान नाडीवर परिणाम झाला असेल, तर त्या मनगटावर नाडी आढळत नाही. यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो किंवा शरीररचना बदलू शकते, ज्यामुळे नेहमीच्या ठिकाणी नाडी जाणवणे कठीण किंवा अशक्य होते,” असे डॉ. सिंगला यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर कोणाला एका मनगटात नाडी जाणवत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. दुखापत किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तरी नेमके कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनेकदा रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू नसणे, धमनीचा अडथळा किंवा मज्जातंतूंशी संबंधित समस्यांमुळे नाडी नसण्याची शक्यता असते, असे डॉ. सिंगला म्हणाले.