मणी रत्नम आणि ए आर रेहमान हे समीकरण म्हंटलं की हमखास उत्तम संगीत आणि चित्रपटाचा आनंद घेता येणार हे आपल्या डोक्यात फिट झालं आहे. या जोडीने जे जे चित्रपट केले ते सगळे जबरदस्त हीट ठरले. ‘रोजा’ या चित्रपटापासून या जोडीचा हा सुरू झालेला प्रवास अगदी आजच्या ‘पीएस १’ आणि ‘पीएस २’ पर्यंत अव्याहत सुरू आहे. ‘रोजा’नंतर लगेचच मणी रत्नम आणि रेहमान यांनी ‘बॉम्बे’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं.

हा चित्रपट तर सुपरहीट ठरलाच, पण यातील गाणीदेखील खूप गाजली. यातील प्रत्येक गाणं आजही प्रत्येकाच्या तोंडी आपल्याला ऐकायला मिळतं. पण तुम्हाला ठाऊक आहे का की या चित्रपटादरम्यान मणी रत्नम एकदा रेहमान यांच्यावर प्रचंड चिडले होते आणि त्यांनी या चित्रपटातून रेहमान यांना काढायचा निर्णयदेखील घेतला होता.

आणखी वाचा : अमिताभ बच्चन व प्रभास यांच्या ‘प्रोजेक्ट के’मध्ये कमल हासन यांची एन्ट्री; नकारात्मक भूमिकेसाठी आकारलं एवढं मानधन

त्यावेळी रेहमान यांनी नेमकं असं काय केलं की मणीरत्नम यांचा राग लगेच निवळला? तेच आपण जाणून घेणार आहोत. ‘इंडिया ओ२’ शी संवाद साधताना ‘बॉम्बे’ चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर राजीव मेनन यांनी हा किस्सा शेअर केला. त्यावेळी ‘बॉम्बे’मधील ‘हम्मा हम्मा’ या गाण्याचं चित्रीकरण तोंडावर आलं होतं, पण रेहमान यांचं गाणं पूर्ण झालं नव्हतं. रेहमान यांच्याशी बरीच बातचीत आणि चर्चा करूनही त्यांना काहीच सुचत नव्हतं.

अखेर रेहमान यांनी संध्याकाळी राजीव मेनन आणि मणी रत्नम यांना बोलावून घेतलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी ‘हम्मा हम्मा’चं चित्रीकरण होणं अपेक्षित होतं. याबद्दल राजीव म्हणाले, “आम्ही त्याच्याकडे गेलो तेव्हा तो म्हणाला की माझ्याकडे अद्याप कोणतीही ट्यून नाही.” त्यावर मणी यांनी रेहमानला यांना प्रश्न विचारला, “मग तू आम्हाला इथे का बोलावलं आहेस?” त्यावर रेहमान म्हणाला, “माझ्याकडे तुम्हाला ऐकवण्यासाठी एक वेगळीच गोष्ट आहे.”

View this post on Instagram

A post shared by ARR (@arrahman)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असं म्हणत रेहमान यांनी ‘बॉम्बे’चं थीम म्युझिक त्यांना ऐकवलं. राजीव आणि मणी ते ऐकून फारच भारावून गेले, दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावर मणी रत्नम रहमान यांना म्हणाले, “रेहमान तू हे नेमकं काय केलं आहेस? मी इथे तुला माझ्या चित्रपटातून काढून टाकायला आलो होतो अन् तू मला हे गाणं ऐकवून रडवलंस.” हेच करण्यासाठी रेहमान तीन दिवस झटत होते आणि यामुळेच त्यांना ‘हम्मा हम्मा’वर काम करता आलं नसल्याचं राजीव यांनी स्पष्ट केलं. यानंतर रेहमान आणि मणी रत्नम यांनी इतिहास रचला. ‘बॉम्बे’ची गाणी आजही ऐकताना आपण मंत्रमुग्ध होतो.