हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना त्यांच्या त्यांच्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत होते. असं म्हणतात राजेश खन्ना यांचे पहिले प्रेम अभिनेत्री अंजू महेंद्रू होत्या. परंतु तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर, त्यांनी स्वतःपेक्षा खूपच लहान असलेल्या डिंपल कपाडियांशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया वेगळे राहू लागले. डिंपल यांनी राजेश खन्नांना घटस्फोट दिला नाही. एकदा खुद्द राजेश खन्ना यांनी घटस्फोट न देण्यामागचे कारण सांगितले होते.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’मधील रेप सीनबाबत आपल्या आजीच्या प्रतिक्रियेने घाबरली होती अदा शर्मा; म्हणाली…

१९९० साली राजेश खन्ना यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तुम्ही डिंपल कपाडियांबरोबर एकत्र पुन्हा याल का. यावर राजेश खन्नांनी उत्तर दिलं होतं परत म्हणजे काय? अगोदर आम्ही कुठं होतो. आम्ही वेगळे राहतो पण आमचा घटस्फोट झालेला नाही. कारण तीच घटस्फोट देत नाहीये. आणि का देत नाही याचं उत्तर तुम्हीच तिला विचारा. योग्य उत्तर तर तिच देईल. मी फक्त एवढचं म्हणेन या सगळ्या मनाच्या गोष्टी आहेत.”

हेही वाचा- सलमान खान बांधणार १९ मजली आलिशान हॉटेल; कोणाच्या नावावर आहे प्रॉपर्टी, कोणत्या सुख-सुविधा मिळणार? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिंपल कपाडिया केवळ १६ वर्षांची असताना त्यांनी राजेश खन्नाबरोबर लग्न केले होते. लग्नानंतर त्यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना अशा दोन मुली झाल्या. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्यात मतभेद झाले आणि डिंपल यांनी मुलींना घेऊन घर सोडलं. मात्र, डिंपल यांनी कधीही राजेश खन्ना यांना घटस्फोट दिला नाही. कॅन्सरमुळे राजेश खन्ना यांची तब्येत बिघडली तेव्हा हे दोघे २०१२ मध्ये एकत्र राहू लागले होते. राजेश खन्नाच्या निधनाआधी अखेरचा काळ डिंपल त्यांच्याबरोबर होत्या. १८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला.