युट्यूबर अरमान मलिक त्याच्या एकाच वेळी गरोदर असलेल्या दोन पत्नींमुळे चर्चेत आला होता. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेला अरमान मलिक प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचे अनेक व्हिडीओ व फोटोही व्हायरल होत असतात. युट्यूबर अरमान मलिकवर प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरमान मलिकने संताप व्यक्त केला होता. एक सारखं नाव असल्यामुळे गायक अरमान मलिकने याबाबत ट्वीट केलं होतं.

“त्याला अरमान मलिक म्हणणं बंद करा, त्याचं खरं नाव संदीप आहे. माझ्या नावाचा इतका दुरुपयोग पुरेसा आहे. सकाळी उठल्यावर अशा बातम्या वाचून वैताग येतो,” असं अरमानने म्हटलं होतं. त्याच्या या ट्वीटवरुन युट्यूबर अरमान मलिकने नाराजी व्यक्त केली होती. “मी कोणाचंही नाव चोरलेलं नाही. या जगात अरमान मलिक नावाचे कितीतरी लोक आहेत. या नावावर कोणाचंही पेटंट नाही. सेलिब्रिटी कुटुंबातून आल्यामुळे गायक अरमान मलिक प्रसिद्ध आहेत. पण मी स्वत: माझी ओळख बनवली आहे”, असं युट्यूबर म्हणाला होता.

हेही वाचा>> “ताई तुम आगे बढो…” भाजपात प्रवेश केलेल्या प्रिया बेर्डेंसाठी सुरेखा कुडची यांची पोस्ट

हेही वाचा>> इरफान खानच्या गर्लफ्रेंडला डेट करत होता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्याला समजलं अन्…

युट्यूबरने त्याच्या दोन्ही पत्नींकडे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आता त्याच्या पत्तीने गायक अरमान मलिकच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या नवऱ्याची लहानपणापासून दोन नावं आहेत. प्रसिद्ध होण्याआधीही लोक त्यांना याच नावाने ओळखत होते”, असं युट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायलने म्हटलं आहे.

हेही वाचा>> देबिना बॅनर्जीला इन्फ्ल्युएन्झा बी व्हायरसची लागण; तीन महिन्यांच्या लेकीपासून दूर राहतेय अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युट्यूबर अरमान मलिकचं खरं नाव संदीप आहे. तो आधी टिकटॉकर होता. त्याला पायल व कृतिका या दोन पत्नी आहेत. अरमानने आधी पायलशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगाही आहे. त्यानंतर तो त्याच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडला. मग अरमानने इस्लाम धर्म स्वीकारला आणि कृतिकाशी दुसरं लग्न केलं आणि स्वतःचं नाव अरमान मलिक ठेवलं. सध्या त्याच्या दोन्ही बायका गरोदर आहेत. पायल आणि कृतिकाच्या बेबी शॉवरचे फोटोही व्हायरल झाले होते.