छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १५वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नुकताच पार पडलेल्या बिग बॉसच्या घरातील टास्कमध्ये बरेच काही झाले. जंगलवासीयांना बिग बॉसच्या मुख्य घरात एण्ट्री मिळाली आहे. दरम्यान, तेजस्वी प्रकाश विशाल कोटियनची बिग बॉसकडे तक्रार करताना दिसते. विशालची वागणूक चुकीची असल्याचे तिने म्हटले आहे.

तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जय भानुशालीशी बोलताना दिसत आहे. ‘मी जशी आहे तशीच इथे वागत आहे. तू कधी मला कोणा विषयी चुगल्या करताना पाहिले आहेस का? तू सकाळपासून ते संध्याळपर्यंत हसतमुख असतेस त्यासाठी काय करतेस असे त्याने (विशालने) मला विचारले. त्यानंर त्याने राहू दे, जाऊ दे असं मला म्हटले. माझे काहीच चुकीचे वागणे नाही. मी जशी आहे तशी आहे’ असे तेजस्वी म्हणते.
आणखी वाचा : नागार्जुनसोबत लिपलॉक सीन देण्यास अभिनेत्रीने ठेवली ही अट; निर्मातेही झाले हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती विशाल विषयी बोलते, ‘तो नेहमी, ये मला मिठी मार असे बोलत असतो. मला ते अजिबात आवडत नाही. हे लोकं ते टेलिकास्ट देखील करु शकणार नाहीत. हे काय सुरु आहे. त्याचे मुलींसोबतचे वागणे चुकीचे आहे. तो जबरदस्तीने जवळ येऊन मला मिठी मारतो. मी अनेकदा त्याला लांब करते. त्याला वाईट नको वाटायला म्हणून मी मस्करीमध्ये किंवा राहू दे राहू दे करत असते.’ जय भानूशालीला देखील विशालचे वागणे खटकत असल्याचे त्याने म्हटले आहे.