Chhaava : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. सध्या या चित्रपटाची मोठी चर्चा सुरु आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफुल आहेत. बॉलीवूड अभिनेता विकी कौशल छावा चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे, तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांचे डोळे पाणावलेलेही पाहायला मिळालं आहे.

‘छावा’ चित्रपट पाहताना चित्रपटगृहात प्रेक्षक हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, अशा घोषणा देत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी एक तरुण घोड्यावर स्वार होऊन थेट सिनेमागृहात आल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या तरुणाने छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा धारण केल्याचंही पाहायला मिळालं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि पराक्रम गाजवणारा ‘छावा’चित्रपट पाहण्यासाठी घोड्यावरून सिनेमागृहात पोहोचलेला तरुण हा नागपुरातील असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपट सुरु असताना तो सिनेमागृहात आल्यानंतर ‘जय भवानी’अशा घोषणा देतानाही दिसला आहे. एवढंच नाही तर तरुणाने सिनेमागृहात प्रवेश करताच त्याच्याबरोबर इतर काहीजण ढोल वाजवत होते. तरुणाने केलेल्या या एन्ट्रीची सध्या चर्चा रंगली आहे.

दरम्यान, छावा चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर चार दिवसांत १२० कोटींहून अधिक कमाई केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केलं जात आहे. ‘छावा’ चित्रपट पाहताना प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमगिरी

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित विकी कौशलने मुख्य भूमिका साकारलेला ‘छावा’ चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. चार दिवसांत ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमगिरी केली आहे. हा ऐतिहासिक चित्रपट पाहून प्रेक्षक भारावले आहेत. अनेकजण पुन्हा पुन्हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरला जात आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची फक्त भारतातच नव्हे तर जगभरात क्रेझ आहे, हे या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने भारतात १२० कोटींहून जास्त कमाई केली, तर जगभरात १६० कोटींहून जास्त कमाई केली.