सिनेसृष्टीतील वर्णभेद यावर सध्या पुन्हा चर्चा सुरू आहे. अनेक कलाकार आता वर्णभेदाविरोधात उघड भूमिका घेत असून अनेकांना याचा सामनाही करावा लागला आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीने नुकताच याबाबतचा अनुभव शेअर केला होता. आता त्यानंतर चित्रांगदा सिंगनेही वर्णभेदाविषयी भाष्य केले असून सावळ्या रंगामुळे संधी नाकारण्यात आली असताना गीतकार गुलजार यांनी कशी मदत केली हा किस्सा सांगितला आहे.

नवाझुद्दीन सिद्दीकीने काही दिवसांपूर्वी सिनेसृष्टीत सावळ्या रंगामुळे अडचणींचा सामना करावा लागल्याचा दावा केला होता. सावळा रंग आणि चांगला दिसत नसल्यामुळे मला सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळाली नव्हती, असे त्याने म्हटले होते. यापार्श्वभूमीवर चित्रांगदाने ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एक अनुभव शेअर केला आहे. ‘सावळ्या रंगामुळे माझ्याकडून मॉडेलिंगचे काम काढून घेण्यात आले होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला हा अनुभव आला होता. दोन पैकी एका मॉडेलची निवड करताना मला सावळ्या रंगामुळे डावलण्यात आले होते’ असे चित्रांगदाने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by @chitrangda

पुढे ती म्हणाली, सुदैवाने मी जी ऑडिशन दिली होती, ती ऑडिशन गुलजार साहेबांनी पाहिली आणि काही दिवसांनी त्यांच्या गाण्यात मला काम करण्याची संधी मिळाली. सिनेसृष्टीतील प्रत्येक व्यक्ती त्वचेच्या रंगाकडे पाहून काम देत नाही हे मला त्या दिवशी लक्षात आले.