नुकतीच प्रदर्शित झालेली ‘द इम्पायर’ वेब सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता कुणाल कपूर, डीनो मोरिया आणि अभिनेत्री दृष्टि धामी मुख्य भूमिका साकारत आहेत. या सीरिजच्या निमित्तानेच या शोचे हे तिनही कलाकार नुकतेच करण जोहरच्या चॅट शोमध्ये पाहुणे म्हणून पोहचले होते. या चॅट शोमध्ये करण जोहरने तिनही कलाकारांसोबत मनसोक्त गप्पा मारत त्यांची फिरकी देखील घेतली.

‘द स्पेशल कॉफी शॉट्स विद करण’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये करण कायमच सेलिबब्रिटीना गोंधळात टाकणारे प्रश्न विचारत असतो. यावेळी देखील त्याने कुणाल कपूरला काही मजेशीर प्रश्न विचारले. कुणाल कपूर या वेब सीरिजमध्ये मुघल शासक बाबरची भूमिका साकारत आहे. करणने कुणाल कपूरला विचारलं, “आलिया भट्ट, दीपिका पदूकोण आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये कुणाल कुणाशी लग्न करेल, कुणाला बंदी बनवेल आणि कुणाचा शिरच्छेद करेल?”

हे देखील वाचा: सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देणं मिलिंद सोमणला महागात, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

करणच्या या प्रश्नावर कुणालने देखील खास उत्तर दिलंय. तो म्हणाला, “मला वाटतं मी आलियाचा शिरच्छेद करेन कारण ती खूपच हुशार आहे. मी अनुष्कासोबत लग्न करेन, मात्र मला वाटतं यामुळे विराट कोहली माझाच शिरच्छेद करेल. तर दीपिका पदूकोणला मी बंदी बनवेन कारण सुंदर आणि महागड्या वस्तूंना बंदिस्तच ठेवलं पाहिजे.” असं कुणाल म्हणाला.

यावेळी कुणालने विराटचं कौतुकही केलंय. विराटला काय मेसेज देशील ? या करणने विचारलेल्या प्रश्नावर कुणाल म्हणाला, “विराट तुम्ही या देशाची आन,बान, शान आहात, विराट कोहली तुम्ही महान आहात.” असं तो म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या महिन्यात ‘ डिस्ने हॉटस्टार’वर’ ‘द इम्पायर’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. मात्र ही सीरिज मघुल प्रशासकांवर आधारित असल्याने अनेकांनी या वेब सीरिजवर बंदी आणण्याची मागणी केली होती.