कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. भारती सिंहने प्रेग्नंट असल्याची गुडन्यूज दिल्यानंतर तिचे सर्वच चाहते फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. भारती सिंह येत्या एप्रिल महिन्यामध्ये मुलाला जन्म देणार आहे. नुकतंच भारतीला पालकत्वाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर देताना ती फार भावूक झाली.

भारती सिंह तिच्या वडिलांच्या निधनानंतर आई आणि बहिणीसोबत एका कारखान्यात काम करायची. याशिवाय तिची आई इतरांच्या घरी जेवण बनवायची. आर्थिक परिस्थितीमुळे कित्येकदा तिने आणि तिच्या कुटुंबियांनी अनेकदा मीठ चपाती खाल्ली आहे. त्यावेळी मी डाळ आणि चपाती खातानाही विचार करायची, असे तिने यावेळी म्हटले.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…
arvind kejriwal in tihar jail
अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगामध्ये
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

“मी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. आमची आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. आर्थिक परिस्थितीमुळे घरात खायला भाजी देखील नाही, असे अनेकदा व्हायचं. त्यामुळे मी ज्याप्रकारे माझे बालपण घालवले आहे ते माझ्या मुलाने बघावे असे मला वाटत नाही. जर मी त्यांना चार भाज्या आणि चपाती खायला घालू शकत नसेन, तर त्यांना डाळ चपातीही मिळत नाही, असे होऊ नये. माझं बाळ अजून पोटात आहे, पण आम्ही आतापासून त्याचे नियोजन सुरू केले आहे. माझ्या लहानपणी मला जे सुख मिळू शकले नाही ते सर्व आनंद मी माझ्या मुलाला देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. बाकी मी सर्व काही देवावर आणि त्याच्या नशिबावर सोडले आहे,” असेही ती म्हणाली.

यापुढे भारती म्हणाली की, “बाळ झाल्यानंतर मी छोटा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला एप्रिलमध्ये बाळ होणार आहे. त्यानंतर मी दोन महिन्यांचा ब्रेक घेईन आणि जुलैमध्ये पुन्हा कामावर परतेन. मी कामापासून दूर राहू शकत नाही. मी गेल्या १५ वर्षांपासून आराम न देता काम करत आहे. त्यामुळे जर मी घरी बसले तर नक्कीच मानसिक आजारी पडेन. माझ्या मुलाने डोळे उघडल्यावर त्याचे आई-वडील किती कष्ट करतात हे पाहावे अशी माझी इच्छा आहे आणि पुढे जाऊन त्यानेही तेवढी मेहनत करावी.”

“खरे सांगायचे तर मी माझ्या लहान मुलाला सेटवर घेऊन जात आहे या विचाराने मला खूप आनंद होतो. माझ्या शूट दरम्यान, कोणीतरी त्याला सांभाळत आहे. त्याची काळजी घेत आहे, हा सर्व विचार करूनच माझ्या चेहऱ्यावर हसू येते. मला खात्री आहे की माझा हा अनुभव खूप चांगला असेल,” असेही भारतीने सांगितले.

“तुम्ही आमच्या बाळाला लाँच कराल का?” भारती सिंहची मागणी ऐकून सलमान खान म्हणाला…

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया लवकरच आई-वडील होणार आहेत. कॉमेडियन भारती सिंगने काही महिन्यांपूर्वी आपल्या युट्युब चॅनलद्वारे एका वेगळ्या अंदाजात ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. भारती सिंह एप्रिलमध्ये मुलाला जन्म देणार आहे.