‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाच्या ट्रेलरने आणि गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात आधीच घर केले होते. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली होती. याच उत्साही वातावरणामध्ये अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जीवनामधील प्रत्येक लहानसहान गोष्टीमध्ये आनंद कसा शोधायचा आणि कसे प्रफुल्लित राहायचे हे या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणारा मानसोपचार तज्ज्ञ जहांगीर आणि कायरा अनेकांचीच दाद मिळवत आहे.

वाचा: Movie Review: जग-कायराची ‘डिअर जिंदगी’

गौरी शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाला चित्रपट कलाकारांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे असेच दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर आणि विशेषत: टिवटरवर विविध हॅशटॅग लावत या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली जात आहे.

चित्रपटाचे कथानक आणि त्याचा प्रभाव पाहता आजच्या तरुणाईच्या जवळ जाणारा चित्रपट गौरी शिंदेने प्रेक्षकांसमोर आणला आहे. पण काही बाबतीत होणाऱ्या टीकांपासून मात्र हा चित्रपटही वाचलेला नाही. त्यामुळे थोड्याथोडक्या टीका आणि प्रेक्षकांतर्फे मिळणारा प्रतिसाद अशीच संमिश्र सुरुवात या चित्रपटाच्या वाट्याला आली आहे हे चित्र चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळत आहे. ‘डिअर जिंदगी’ या चित्रटपटामध्ये अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्याव्यतिरिक्त कुणाल कपूर, अंगद बेदी, अली जफर, इरा दुबे हे कलाकारही झळकत आहेत. ‘डिअर जिंदगी’बद्दल केलेले काही ट्विट्स खालीलप्रमाणे..

t1-2

t2-2

t3-1

t4-1

t5-1

t6-1

t7-1