बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र चित्रपटसृष्टीपासून लांब असले, तरी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असून ते नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. धर्मेंद्र हे नेहमी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना जुने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या पहिल्या व्हिंटेज गाडीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

धर्मेंद्र यांनी होळीच्या निमित्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी त्यांची जुनी फिएट गाडी चालवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धर्मेंद्र हे डोंगरातील एका खडबडीत रस्त्यांवर गाडी चालवत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: ही गाडी चालवली आहे. त्यांची ही स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.

या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र हे त्यांची पहिली गाडी डोंगरावर चालवताना दिसत आहेत. या वयातही ते फार मस्त गाडी चालवताना दिसत आहे. ‘माझी जुनी फिएट’ असे त्यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. त्यांनी या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे. माझी सर्वात आवडती, माझी पहिली कार. मी ही गाडी १९६० मध्ये विकत घेतली होती. आज मी तिला डोंगरातील एका खडबडीत रस्त्यावरून चालवले. होळीच्या शुभेच्छा. मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो., असे धर्मेंद्र म्हणाले.

धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र ही जोडी ७० च्या दशकातील सुपरहिट जोडी म्हणून ओळखली जाते. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘दिल्लगी’ आणि ‘ड्रिम गर्ल’ अशा काही चित्रपटांचा समावेश आहे.

Video : भर मुलाखतीत चिन्मय मांडलेकरच्या एका कृतीने वेधलं लक्ष, दिग्पाल लांजेकर म्हणाले “हे पाहून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान धर्मेंद्र लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. धर्मेंद्र हे करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे. यात रणवीर सिंह, आलिया भट्ट, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत