एक व्हिलन परत येतोय…

एक व्हिलन रिटर्न्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला २०१४ सालचा एक व्हिलन हा चित्रपट बराच गाजला. त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहेत. अॅक्शन, रोमान्स, ड्रामा यांचे मिश्रण असलेला हा चित्रपट मोहित सुरीने दिग्दर्शित केला होता तर एकता आणि शोभा कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर अंकीत तिवारी, मिथून आणि सोच या बँडने या चित्रपटाला संगीताचा साज दिला होता.

आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे एक व्हिलन रिटर्न्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अर्जून कपूर, जॉन अब्राहम, अभिनेत्री दिशा पटनी आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती बालाजी टेलिफिल्म्स आणि गुलशन कुमार टी सिरीज यांची असून दिग्दर्शन पहिल्या भागाचे दिग्दर्शक मोहित सुरीच करणार आहेत. आजपासून ३६५ दिवस म्हणजे ११ फेब्रुवारी २०२२ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं या चित्रपटाच्या पोस्टरवरून दिसत आहे. यातल्या कलाकारांनी आपल्या सोशल मिडिया हँडल्सवरून हे पोस्टर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

या चित्रपटातील कलाकारांचे लुक्स, कथा, पटकथा, पहिल्या चित्रपटापेक्षा यात काय वेगळं आहे याची उत्सुकता सर्वांना आहेच. पण ते पाहण्यासाठी आपल्याला ११ फेब्रुवारी २०२२ची वाट पाहावी लागणार एवढं नक्की!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ek villain returns starring john abraham arjun kapoor

ताज्या बातम्या