Entertainment News Updates, Celebrity News : कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ची निवड करण्यात आली आहे. एवढंच नाही तर हिंदी चित्रपटांसोबतच यंदा कान्स चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांनाही मानाचं स्थान मिळालं आहे. प्रसाद ओकचा चित्रपट ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करताना दिसत आहे. तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘रानबाजार’ वेब सीरीजमुळे होत असलेल्या ट्रोलिंगला उत्तर दिलं आहे. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदारनं महाराष्ट्रातील नाट्यगृहांची भीषण अवस्था सांगितली आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मागच्या काही दिवसांपासून सलमान खानसोबतच्या वाढत्या मैत्रीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कंगना रणौत सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माच्या ईद पार्टीमध्ये दिसली होती. बॉलिवूडच्या कोणत्याही कार्यक्रमाला किंवा पार्टीला हजेरी न लावणारी कंगना सलमानच्या पार्टीत दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ‘पृथ्वीराज’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच मानुषी चर्चेत आली आहे. ती कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे. याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Cannes 2022: परी म्हणू की सुंदरा…; रेड कार्पेटवरील उर्वशी रौतेलाच्या लूकचे खास फोटो
कलाविश्व आणि ग्लॅमर जगताची सुरेख सांगड घालणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाला १७ मे पासून सुरुवात झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली आहे. या महोत्सवातील काही फोटो उर्वशीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
Photos : मौनीचे मेटालिक स्कर्ट आणि टॉपमधील ग्लॅमरस लूकचे फोटो पाहिलेत का?
अभिनेत्री मौनी रॉयचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मौनीने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो मौनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
फोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
सोनालीच्या तिसऱ्या हनिमूनचे फोटो पाहिलेत का?
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेनोडेकरसोबत मेक्सिकोमध्ये तिसरं हनिमून एन्जॉय करतेय. हनिमूनचे फोटो सोनालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
Photos : ‘जब से तेरे नैना…’; अभिनयाप्रमाणेच ‘या’ बॉलिवूड कलाकारांचे डोळेही करतात चाहत्यांना मंत्रमुग्ध
कलाकार आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असतात. पण बॉलिवूडमध्ये असेही कलाकार आहेत जे अभिनयासोबतच आपल्या डोळ्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
फोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
प्रसिद्धी आणि ग्लॅमर क्षेत्रात काम करत असताना नाना पाटेकर यांचा साधेपणा कधीच लपून राहिला नाही. नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसतेय.
Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा; बॉडीकॉन ड्रेसमधील स्टनिंग लूकने वेधलं लक्ष
दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने देखील कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली. तमन्नाने कान्स चित्रपट महोत्सवाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गेल्या बऱ्याच दिवसांपासून बहुप्रतिक्षित ‘रानबाजार’ वेबसीरिजची चर्चा सुरु आहे. या सीरिजचा टीझर, पोस्टर प्रदर्शित होताच लाखो प्रेक्षकांनी याला पसंती दर्शवली. ‘रानबाजार’च्या ट्रेलरची प्रतिक्षा प्रेक्षकांना होती. अखेरीस या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच काही मिनिटांमध्येच १० हजारपेक्षा अधिक लोकांनी हा पाहिला आहे.
मागच्या ३ वर्षांपासून कोणत्याही चित्रपटात न दिसलेला शाहरुख खान लवकरच ‘पठाण’ चित्रपटातून बॉलिवूड पुनरागमन करत आहे. ज्यात रणवीरची पत्नी दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहे.
कान्स चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी होण्याचा मान पहिल्यांदाच एका लोककलावंताला मिळाला आहे. हा लोककलावंत नेमका आहे तरी कोण? हे आपण जाणून घेणार आहोत.
Cannes Film Festival : दीपिकाच्या रेट्रो लूकने वेधलं लक्ष; ‘मस्तानी’च्या रेड कार्पेटवरील साडीतील लूकची सोशल मीडियावर चर्चा
सध्या सगळीकडे कान्स चित्रपट महोत्सवाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ज्युरी म्हणून काम पाहत आहे. कान्स चित्रपट महोत्सवातील दीपिकाच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कान्स चित्रपट महोत्सवातील दीपिकाच्या रेट्रो लूकचे फोटो पाहा
जयप्रभा स्टुडिओ शूटींगसाठी खुला झालाचं पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या ९४ दिवसांपासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलाकारांच्या वतीनं आंदोलन सुरु आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
चित्रपट आणि फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या कान्स २०२२ महोत्सवात भारताला 'कंट्री ऑफ ऑनर' चा सन्मान मिळाला आहे. या कान्स चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्राचे पात्र साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊतचे इन्स्टाग्रामवरुन एक्झिट घेतली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तो इन्स्टाग्रामवर दिसणार नाही.
हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पूर्वश्रमीची पत्नी एंबर हर्ड मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. या दोघांचा खटला न्यायालयात सुरू असून याच्या सुनावणीदरम्यान दोघांनीही एकमेकांवर धक्कादायक आरोप केले आहे.
सोशल मीडियावर फारच सक्रिय असणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या लंडनमध्ये पतीसोबत सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहे. लंडनमधील मजा-मस्ती करतानाचे तिचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लंडनमध्ये रिल व्हिडीओ बनवण्याचा मोह तिला काही आवरला नाही. पण हा व्हिडीओ करत असताना नेमकं काय घडलं हे प्रार्थनाने सांगितलं आहे.
'बिग बॉस' फेम राखी सावंत नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. मागच्या काही दिवसांपासून ती तिच्या नव्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. अलिकडेच एका इव्हेंटमध्ये तिने व्हिडीओ कॉलवरून आपल्या बॉयफ्रेंडची सर्वांशी ओळख करून दिली होती. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राखीनं तिचं रिलेशनशिप आणि बॉयफ्रेंडबद्दल काही खुलासे केले आहेत.
सध्या प्रियांका चोप्रा हॉलिवूड सीरिज ‘सिटाडेल’च्या (Citadel) चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. चित्रीकरणादरम्यानचे फोटो ती सतत शेअर करत असते. याच सेटवरील एक फोटो प्रियांकाने शेअर केला आहे. आणि तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी मात्र चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली.
प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेल्या ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. १३ मे २०२२ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं आठवड्याअखेरीस बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं अभिनेता रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरादार’ चित्रपटालाही मागे टाकलं आहे.
Photos : 'शेवंता' पोहोचली दुबईला...; आईसोबत अपूर्वाचे समर व्हॅकेशन
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून घराघरात पोहोचली. अपूर्वा सध्या आईसोबत दुबई फिरायला गेली आहे.
आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाला आता सुरुवात झाली आहे. ७५वा कान्स चित्रपट महोत्सव २८ मे पर्यंत असणार आहे. त्याचबरोबरीने सहा भारतीय चित्रपटांना कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. या सहा चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा समावेश आहे. ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे.
अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने बालगंधर्व रंगमंदिर आणि अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने कलाकारांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल वक्तव्य केले आहे.
रानबाजार या वेबसीरिजमध्ये प्राजक्ता माळीचा खूप बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.
यावरुन प्राजक्ताला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी यावरुन तिच्यावर टीका केली आहे. तिच्या या वेबसीरिजमधील बोल्ड दृश्यांमुळे तिला ट्रोल केले जात आहे. मात्र नुकतंच प्राजक्ताने यावर भाष्य केले आहे.