लोकप्रिय दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचे चित्रपट बघणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात. कारण राजामौली काहीतरी करणार म्हणजे लार्जर दॅन लाइफचा अनुभव असणार हे नक्की. यावेळी राजामौली साऊथ सुपरस्टार महेश बाबूला घेऊन चित्रपट बनवण्याची तयारी करत आहेत. आता त्यांनी या आगामी चित्रपटाबद्दल एक महत्वाची बातमी शेअर केली आहे.

आणखी वाचा : काही महिने ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर आता लंडनला रवाना, कारण…

राजामौली यांनी खूप आधीच ते महेश बाबूबरोबर चित्रपट करणार आहेत असे सांगितले होते. पण आता त्यांनी हा चित्रपट कोणत्या जॉनरचा असेल याचा खुलासा केला आहे. राजामौली प्रभास बरोबर केलेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटाचे दोन्ही भाग तुफान गाजले. त्यानंतर एस.एस.राजामौली यांचा ‘आरआरआर’ बॉक्सऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. यामध्ये रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत होते. तर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका होत्या. आता राजामौली तिसरा चित्रपट महेश बाबू सोबत करत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्कंठा होती.

हेही वाचा : ‘बाहुबली’च्या तब्बल ३६ सीन्सची राजमौलींनी हॉलिवूड चित्रपटांतून केली चोरी? व्हिडीओद्वारे झाला मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजामौली यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेमध्ये एका फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. तिथे राजामौली यांच्या ‘आरआरआर’बरोबर इतरही अनेक चित्रपट दाखवले गेले. यादरम्यानच राजामौलींना त्यांच्या या तिसऱ्या चित्रपटाविषयी विचारले गेले. तेव्हा त्यांनी सांगितलं, “महेश बाबू सोबत माझा आगामी चित्रपट हा एक ग्लोबट्रोटिंग अॅक्शन अॅडव्हेंचरवर आधारित असणार आहे.” त्यासोबतच त्यांनी या चित्रपटाच्या कामालाही सुरुवात केली आहे. महेश बाबूला अशाप्रकारच्या ग्लोबट्रोटिंग अॅक्शन अॅडव्हेंचर चित्रपटात पाहणं ही प्रेक्षकांसाठी एक ट्रीटच असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती केएल नारायण करत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला या वर्षात सुरुवात होणार आहे असे म्हटले जात आहे.