Video : अनिल कपूरचा ‘रफी’याना अंदाज पाहिलात का?

सोनू निगमच्या आवाजातील हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना थिरकायला लावणार हे नक्की.

anil kapoor
अनिल कपूर

मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनिल कपूर यांनी अनोख्या प्रकारे आदरांजली वाहिली आहे. रफी यांच्या ‘बदन पे सितारे’ या प्रसिद्ध गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन अनिल कपूर यांच्या आगामी ‘फन्ने खान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटात ते एका ऑर्केस्ट्रा गायकाची भूमिका साकारत आहेत, जो मोहम्मद रफी आणि शम्मी कपूर यांचा मोठा चाहता असतो आणि अक्षरश: देवासारखी त्यांची पूजा करत असतो.

अमित त्रिवेदीने या गाण्याला संगीतबद्ध केलं असून मूळ गाण्याचे बोल तसेच ठेवण्यात आले आहेत. सोनू निगमच्या आवाजातील हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना थिरकायला लावणार हे नक्की.

७३व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये नामांकन प्राप्त ‘एव्हरीबडीज फेमस’ या बेल्जियन चित्रपटाचा ‘फन्ने खान’ हा रिमेक आहे. पालकांच्या इच्छेखातर संगीत क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आलेल्या एका तरुणीचा प्रवास या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन आणि राजकुमार राव यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. ऐश्वर्या यात संगीत क्षेत्रातील एका लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारत आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अतुल मांजरेकरनं केलं आहे. ३ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fanney khan badan pe sitare song released anil kapoor rajkummar rao aishwarya rai bachchan