Firangi Box office collection Day 1: जाणून घ्या, कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ची पहिल्या दिवसाची कमाई

हा चित्रपट ‘पद्मावती’सारखा बिग बजेट नसला तरी यामधून प्रेक्षकांचे किमान मनोरंजन होण्याची शक्यता आहे.

firangi
फिरंगी

सेन्सॉरच्या आडकाठीमुळे या आठवड्यात ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होत नसल्यामुळे चित्रपटगृहांमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांची निराशा होण्याची शक्यता होती. मात्र, कपिल शर्माचा ‘फिरंगी’ हा प्रेक्षकांसाठी चांगला पर्याय ठरण्याची शक्यता आहे. हा चित्रपट ‘पद्मावती’सारखा बिग बजेट नसला तरी यामधून प्रेक्षकांचे किमान मनोरंजन होण्याची शक्यता आहे.

वाचा : मिलिंदपाठोपाठ मकरंदही प्रेयसीसोबत राहतोय लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये?

‘किस किस को प्यार करू’नंतर कपिल शर्माच्या ‘के९ फिल्म्स बॅनर’ची निर्मिती असलेला ‘फिरंगी’ चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला. मात्र, कपिलच्या पहिल्या चित्रपटाला जसा प्रतिसाद मिळाला होता तसा या चित्रपटाला मिळू शकलेला नाही. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ १५ टक्के तिकीटांची विक्री झाली. त्यापेक्षा युएईमध्ये चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे कळते. तेथे ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘फिरंगी’ने ५७.१३ लाखांची कमाई केल्याचे तरण आदर्श यांनी म्हटले आहे. मात्र, या चित्रपटाने भारतात केलेल्या कमाईचा आकडा अजूनही समजलेला नाही.

वाचा : जेव्हा शाहिद भडकतो..

या चित्रपटाचे कथानक ब्रिटीशकालीन असले तरी हलकीफुलकी कथा आणि तेवढेच ताकदीचे कलाकार यामुळे ‘फिरंगी’ चित्रपट अगदीच नीरस झाला नसल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे. वेगळी कथा आणि त्या कथेला साजेशा कलाकारांची फौज दिग्दर्शक राजीव धिंग्रा यांनी चित्रपटात घेतली होती. कपिल शर्माचा अभिनय खूप सुंदर वगैरे नसला, तरी राजेश शर्मा, इनामुलहक, कुमुद मिश्रा, अंजन श्रीवास्तवसारख्या कसलेल्या कलाकारांनी चित्रपटात मजा आणल्याचेही चित्रपट समीक्षकांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Firangi box office collection day 1 kapil sharma starrer make a slow start