stree box office collection day 1 : जाणून घ्या, ‘स्त्री’ची पहिल्या दिवसाची कमाई

बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार श्रद्धा कपूर, राजकुमार याव यांनी या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिका आहेत.

बॉलिवूड दिग्दर्शक दिनेश विजन यांच्या बहुचर्चित ‘स्त्री’ या विनोदी भयपट चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर त्याचं खातं उघडलं. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती. बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांची या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६.८२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रसिद्ध व्यापार आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

‘अपेक्षेप्रमाणेच ‘स्त्री’ने बॉक्स ऑफिसवर आपली जादू चालविली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६.८२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे विकेंडच्या दिवशी या चित्रपटाची कमाई अधिक होईल’, असं ट्विट तरण आदर्श यांनी केलं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील चंदेरी गावामध्ये या चित्रपटाची कथा रंगविण्यात आली असून विकी (राजकुमार राव), बिट्टू (अपारशक्ती खुराणा) आणि दाना (अभिषेक बॅनर्जी) हे तीन जिवलग मित्र दाखविण्यात आले आहेत. यापैकी विकीच्या वडिलांचे टेलरिंगचे दुकान असल्यामुळे विकीचा नवनव्या फॅशनचे कपडे शिवण्यामध्ये हातखंडा आहे. मात्र खास राजेशाही शैलीत जगण्याची सवय असलेल्या विकीला हे काम मान्य नसल्याने तो त्याच्या अन्य दोघां मित्रांबरोबर गावात फिरत असतं. याच दरम्यान त्यांची भेट ‘स्त्री’ नावाच्या भूताशी होते आणि चित्रपटाला खरी रंगत येत असल्याचं दिसून येतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: First day box office collection of rajkumar raos and shraddha kapoors stree

ताज्या बातम्या