छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस 15′ हा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून पाहिला जातो. या शोचा काल अंतिम सोहळा पार पडला. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वाची विजेती ठरली. तेजस्वीला बिग बॉसची ट्रॉफी आणि ४० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. सर्वांनी तेजस्वीवर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला. तर दुसरीकडे गौहर खानने ट्वीट करत टीका केली आहे.

गौहरने ट्वीट करत तेजस्वीला अप्रत्यक्ष टोमणा मारला आहे. ‘बिग बॉस १५च्या विजेत्याची घोषणा होत असताना स्टुडिओमधील शांततेने सर्व काही स्पष्ट केले होते. बिग बॉसचा विजेता एकच आहे आणि संपूर्ण जगाने त्याला चमकताना पाहिले आहे. प्रतीक सेहजपाल.. तू सर्वांची मने जिंकली आहेस. बिग बॉसच्या घरात गेलेला प्रत्येकाला तू आवडला आहेस. लोकांनाही तू आवडतोस’ या आशयाचे ट्वीट करत गौहरने प्रतीकचे कौतुक केले.
आणखी वाचा : हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझानच्या फोटोवर बॉयफ्रेंडची कमेंट, म्हणाला…

काल बिग बॉसच्या १५ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळा रंगला. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. बिग बॉसच्या या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी सर्वच स्पर्धकांनी नृत्याविष्कार करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. बिग बॉसच्या टॉप ६ मध्ये तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळाले. पण टॉप ६ मध्ये दाखल झाल्यानंतर रश्मी देसाई ही कमी मतांमुळे बाहेर झाली. तर निशांत भट्टने १० लाख रुपये घेत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.