सबसे कातिल गौतमी पाटील अशी ओळख असणाऱ्या गौतमीची सध्या लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या नृत्य कौशल्याने आणि दिलखेच अदाने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावणारी गौतमी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कोणताही समारंभ असो तिथे गौतमीचा कार्यक्रम आता आवुर्जन ठेवला जातो. राज्यात तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्यामुळे तिच्या कार्यक्रमाला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अशा या लोकप्रिय नृत्यांगनाला महाराष्ट्रातील नेमकं कोणतं ठिकाण आवडतं, याचा खुलासा तिनं स्वतः केला आहे.

हेही वाचा – ‘तुझी आवडती सेलिब्रिटी कोण?’; गौतमी पाटीलनं दिलं कौतुकास्पद उत्तर, म्हणाली…

गौतमीचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रम होतं असतात. अलीकडेच दहीहंडीच्या निमित्ताने तिचा मुंबईत देखील कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पण गौतमीला मुंबई, पुणे नाहीतर कोल्हापूरात कार्यक्रम करायला खूप आवडतं. तिचं कोल्हापूर हे आवडतं ठिकाण आहे, असं तिनं ‘न्यूज १८ लोकमत’च्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

हेही वाचा – “आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण काही दिवसांपूर्वी याचं कोल्हापूरामधील तिचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. प्रशासनासह पोलिसांनी तिच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. यावर गौतमी या मुलाखतीत म्हणाली की, “कोल्हापूरमधील माझे कार्यक्रम रद्द केले, याचं मला खूप वाईट वाटलं. पण कार्यक्रम रद्द करण्यामागचं नेमकं कारण असं होतं की, गणेशोत्सव असल्यामुळे पोलिसांना सगळ्या गणपती मंडळांकडे लक्ष द्यावं लागतं. अशातच माझा तिथे कार्यक्रम असेल तर ते आम्हाला तेवढं संरक्षण देऊ शकणार नव्हते. कारण माझ्या कार्यक्रमाला किती गर्दी होते, हे माहित असेल. म्हणून कोल्हापूरातील कार्यक्रम रद्द झाला.”