बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याला शेवटचे कोणत्या पुरस्कार सोहळ्यात पाहिले होते, असा सवाल केला तर त्याचे उत्तर तुम्हालाही आठवणार नाही. पण, कालचा दिवस काहीतरी वेगळाच होता. कारण आमिर शुक्रवारी चक्क एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिला होता. ‘जीक्यू मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्याला तो हजर होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : #LoserWaliGarbaStep तेजस्विनीची ‘लुजरवाली गरबा स्टेप’ पाहिलीत का?

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ फेम आमिर अगदी स्टायलिश लूकमध्ये यावेळी दिसला. याच चित्रपटातील त्याचा कान टोचलेला आणि मिशीवाला लूकही पाहावयास मिळाला. पण, या सोहळ्यातील सेल्फीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बॉलिवूडचा अतरंगी अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या रणवीर सिंगने आमिरसोबतचा सेल्फी शेअर केलाय. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने लिहिलंय की, ‘ठग्स लाइफ #gqawards’. फोटोत रणवीरचा नेहमीचाच कूल अंदाज पाहायला मिळतो.

वाचा : रेमोच्या ‘एबीसीडी ३’मध्ये झळकणार ‘हा’ अभिनेता

‘जीक्यू मॅन ऑफ द इयर’मध्ये आमिरला ‘क्रिएटिव्ह मॅव्हरिक’ ( Creative Maverick ) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर रणवीरला ‘एण्टरटेनर ऑफ द इयर’चा ( Entertainer of the Year ) पुरस्कार मिळाला.

याव्यतिरीक्त अनुष्का शर्मा ‘वूमन ऑफ द इयर’, राजकुमार राव ‘अॅक्टर ऑफ द इयर’, कोंकणा सेन शर्मा ‘एक्सलेन्स इन डायरेक्टर अॅण्ड अॅक्टिंग’, राहुल बोस ‘एजंट ऑफ सोशल चेंज’, श्रीदेवी ‘एक्सलेन्स इन अॅक्टिंग’, करण जोहर ‘प्रॉड्युसर ऑफ द इयर’, इरफान खान ‘आउटस्टॅण्डिंग अचिव्हमेंट’ आणि सिद्धार्थ मल्होत्राला ‘मोस्ट स्टायलिश मॅन’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, ‘जीक्यू’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा एकमेकांची गळाभेट घेत असतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या सोहळ्यात पूर्वाश्रमीच्या या प्रियकरांनी सर्व छायाचित्रकारांच्या नजरा वेधल्या होत्या. मलायका अरोरा, राधिका आपटे, शमिता शेट्टी, कल्की कोचलीन या अभिनेत्रींनी आपल्या स्टायलिश अदांनी सोहळ्याला ‘चार चाँद’ लावले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gq men of the year awards photos video ranveer singh and aamir khan embody the thug life
First published on: 23-09-2017 at 11:16 IST