Entertainment News 18 May 2025 : मराठी सिनेविश्वात १ मे रोजी ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ असे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. ‘गुलकंद’मध्ये सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, ‘आता थांबायचं नाय’ सिनेमात भरत जाधव, आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, ओम, पर्ण पेठे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर गेल्या १७ दिवसांमध्ये किती कमाई केली जाणून घेऊयात…

सई ताम्हणकरच्या ‘गुलकंद’ सिनेमाने जगभरात गेल्या १७ दिवसांमध्ये ५.२५ कोटी कमावले आहेत. तर, ‘आता थांबायचं नाय’ सिनेमाचं वर्ल्ड वाइड कलेक्शन ४.६७ कोटी एवढं आहे. सध्या या दोन्ही चित्रपटांवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Live Updates

Entertainment News Today

18:16 (IST) 18 May 2025

Video : ३७ वर्षांपूर्वीचं 'ते' सुपरहिट गाणं…; वडील चंकी पांडे यांच्यासह अनन्याचा जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

अनन्या पांडे व चंकी पांडे यांचा ३७ वर्षांपूर्वीच्या 'त्या' सुपरहिट गाण्यावर जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल ...वाचा सविस्तर
17:41 (IST) 18 May 2025

अक्षय कुमार धबधब्याखाली 'या' अभिनेत्रीबरोबर रोमान्स करताना दिसला, चित्रपटाबद्दल दिली महत्त्वाची माहिती

अक्षय कुमारने त्याच्या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूत बंगला' बद्दल माहिती दिली आहे. ...वाचा सविस्तर
17:05 (IST) 18 May 2025

"माझे चित्रपटाच्या निर्मात्यांबरोबर…", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मधून बाहेर पडल्यानंतर वक्तव्य, पोस्ट करत म्हणाले…

'हेरा फेरी ३' मध्ये बाबू भैय्याची भूमिका साकारण्यास नकार दिल्यानंतर, परेश रावल यांची प्रतिक्रिय, म्हणाले... ...सविस्तर बातमी
16:40 (IST) 18 May 2025

विराट कोहलीने राहुल वैद्यला इन्स्टाग्रामवर केलं अनब्लॉक, गायकाने स्वत: केला खुलासा; म्हणाला, "धन्यवाद विराट तुम्ही…"

"तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट...;" विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर अनब्लॉक केल्यानंतर राहुल वैद्यची पोस्ट म्हणाला... ...वाचा सविस्तर
16:35 (IST) 18 May 2025

ऐश्वर्याने अभिषेकबरोबर 'कजरा रे' गाण्यावर धरला ठेका, लेकही होती सोबतीला, पाहा व्हिडीओ

राहुल वैद्यने 'बंटी और बबली' या चित्रपटातील 'कजरा रे' हे हिट गाणे गायले. ...सविस्तर बातमी
15:44 (IST) 18 May 2025

मालिकाविश्वातील 'ती' लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र येणार! 'कलर्स मराठी'च्या 'या' लोकप्रिय मालिकेत झळकणार…

'कलर्स मराठी'च्या लोकप्रिय मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री, जुनी जोडी पुन्हा एकत्र झळकणार ...अधिक वाचा
15:30 (IST) 18 May 2025

"दुसऱ्याकडून करून घ्या…", ऋषी कपूर यांनी नाकारला होता २१ वर्षे जुना हिट चित्रपट; काय होतं कारण?

ऋषी कपूर यांचे बॉलीवूडमध्ये एक उत्तम करिअर होते. त्यांनी स्वतःच्या बळावर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ...वाचा सविस्तर
14:13 (IST) 18 May 2025

शाहरुख खान वास्तुशास्त्रावर ठेवतो विश्वास, 'पठाण'-'जवान' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी केले होते 'हे' काम

'किंग' या चित्रपटातून शाहरुख खान लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...सविस्तर बातमी
13:41 (IST) 18 May 2025

टिप-टिप बरसा पानी…; रवीना टंडनच्या लेकीचा जबरदस्त डान्स, फक्त २० वर्षांची आहे राशा; नेटकरी म्हणाले, "सेम आईसारखी…"

Video : रवीना टंडनची लेक राशा थडानीचा डान्स पाहिलात का? पुरस्कार सोहळ्यात 'टिप-टिप बरसा पानी...' गाण्यावर केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ ...सविस्तर वाचा
13:25 (IST) 18 May 2025

"बाई आणि बाटलीपासून लांब राहायचं" शरद पोंक्षेंनी मुलगा स्नेहला दिला होता सल्ला; म्हणाले, "यामुळे करिअरची वाट…"

"बाई आणि बाटलीपासून लांब राहायचं" शरद पोंक्षेंनी मुलाला दिला होता सल्ला, म्हणाले... ...वाचा सविस्तर
13:09 (IST) 18 May 2025

बॉलीवूडनंतर आता 'भुल भुलैय्या'च्या दिग्दर्शकाची मराठीत एन्ट्री! अमृता सुभाष झळकणार प्रमुख भूमिकेत, सिनेमाचा टीझर प्रदर्शित

'भुल भुलैय्या'चे दिग्दर्शक अनीस बज्मी 'जारण' नावाचा त्यांचा पहिला मराठी चित्रपट घेऊन येत आहे. ...वाचा सविस्तर
12:56 (IST) 18 May 2025

'स्वदेस'च्या सेटवर शाहरुख खानचा झाला होता अपघात, चित्रपटातील अभिनेत्याने सांगितला किस्सा, म्हणाला, "माझ्यामुळे त्याला…"

"'स्वदेस'च्या सेटवर माझ्यामुळे शाहरुख खानला दुखापत...;" चित्रपटातील कलाकाराचा खुलासा, म्हणाला... ...सविस्तर बातमी
12:35 (IST) 18 May 2025

ट्विंकल खन्ना हिरोईन, पण भाव खाऊन गेलेली मराठमोळी अभिनेत्री; सलमान खानच्या 'या' सिनेमातील गाणं एका रात्रीत हिट झालं अन्…

सलमान खानच्या 'या' चित्रपटातील गाजलेल्या गाण्यामध्ये झळकली होती 'ही' मराठमोळी अभिनेत्री ...वाचा सविस्तर
12:22 (IST) 18 May 2025

Zee Cine Awards 2025 : 'स्त्री २'चा जलवा, मिळाले तब्बल 'इतके' पुरस्कार! यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला…; वाचा विजेत्यांची यादी

Zee Cine Awards 2025 Winners List : 'झी सिने अवॉर्ड्स'मध्ये कोणी मारली बाजी? वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी... ...वाचा सविस्तर
11:47 (IST) 18 May 2025

रणवीर सिंह 'या' ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी आठवडाभर दररोज २२ तास करायचा शूटिंग, काय होते कारण?

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो ...सविस्तर बातमी
11:01 (IST) 18 May 2025

निरोप घेण्याची वेळ…; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची Exit! नेटकरी म्हणाले, "तुला मिस करू…"

Premachi Goshta : 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली 'प्रेमाची गोष्ट' मालिका, स्वत: पोस्ट शेअर करत दिली माहिती... ...अधिक वाचा
10:34 (IST) 18 May 2025

"२० व्या वर्षी …", जिया खान प्रकरणावर सूरज पांचोली स्पष्टच बोलला, म्हणाला, " मला फसवण्यात आले अन्…"

Sooraj Pancholi On Jiah Khan suicide Case : सूरज पांचोलीवर अभिनेत्रीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप होता. ...सविस्तर बातमी
10:25 (IST) 18 May 2025

विजय वर्मा त्याच्या मित्रांच्या मदतीने घरातून गेला होता पळून; कारण सांगत म्हणाला, "माझ्या आई-वडिलांना…"

अभिनेता विजय वर्माने आता त्याच्या आयुष्यातील एक मनोरंजक किस्सा सांगितला आहे. ...सविस्तर वाचा
09:15 (IST) 18 May 2025

Gulkand Marathi Movie : सई ताम्हणकरच्या 'गुलकंद' चित्रपटाने १७ दिवसांत जमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला...

Gulkand Marathi Movie Box Office Collection : सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुलकंद’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १७ दिवसांत ५.२५ कोटींचा गल्ला जमावला आहे. ही कमाई अलीकडच्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांच्या तुलनेत फारच चांगली आहे.

09:14 (IST) 18 May 2025

Ata Thambaycha Naay Box Office Collection : 'आता थांबायचं नाय' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १७ दिवसांत कमावले...

सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पर्ण पेठे, आशुतोष गोवारीकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘आता थांबायचं नाय’ सिनेमा यंदा १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

‘आता थांबायचं नाय’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गेल्या १७ दिवसांत ४.६७ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय सिनेविश्वातील अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटाचं आणि दिग्दर्शक शिवराज वायचळ याचंही कौतुक केलं आहे.

‘रेड २’, ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’ असे अनेक सिनेमे या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली जाणून घेऊयात.