नुकतंच काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर करोना बाधित असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर लगेचच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही करोनाची लागण झाली. आता बॉलीवूडच्या आणखी एका चेहऱ्याला करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे.
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे.
कालच्या आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून सिद्धांतने याबद्दल माहिती दिली आहे. त्याची तब्येत स्थिर असून तो सध्या विलगीकरणात आहे. त्याने याबद्दल माहिती देणारी एक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्याने शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये तो म्हणतो, “तुम्हा सर्वांच्या काळजीबद्दल धन्यवाद. माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर असून मी गृह विलगीकरणात आहे. मी सर्व प्रकारची काळजी घेत आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचं पालन करत आहे. या परिस्थितीला सामोरा जात आहे.”
View this post on Instagram
‘गली बॉय’ या सिनेमातून प्रसिद्धी मिळालेला हा कलाकार गेल्या काही आठवड्यांपासून कतरिना कैफ आणि इशान खट्टर यांच्यासोबत ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. काल संध्याकाळी त्याला करोनाची लागण झाल्याचं निदान झालं.
View this post on Instagram
सिद्धांतचा ‘फोन भूत’ हा चित्रपट हॉरर कॉमेडी असणार आहे. याचं दिग्दर्शन गुरमित सिंह हे करत आहेत तर याचा निर्माता अभिनेता फरहान अख्तर आहे. हा चित्रपट या वर्षात प्रदर्शित होईल. याचसोबत दिपिका पादुकोन आणि अनन्या पांडे यांच्याबरोबर एका चित्रपटात तो काम करत आहे ज्याचं नाव अजून निश्चित झालेलं नाही. त्याचबरोबर करन जोहरच्या ‘युध्रा’ या चित्रपटातही तो दिसणार आहे.