प्रसिद्ध टीव्ही निर्माता, अभिनेता व ‘बिग बॉस ११’ या रिअॅलिटी शोचा स्पर्धक विकास गुप्ता याने बायसेक्शुअल असल्याचा खुलासा केला आहे. विकासने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत हा खुलासा केला आहे. “मी अभिमानाने सांगतो की मी बायसेक्शुअल आहे आणि आता मला कोणी ब्लॅकमेल करू शकणार नाही किंवा कोणी माझ्यावर दबाव आणू शकणार नाही”, असं तो या व्हिडीओत म्हणाला.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘मी जसा आहे तसा सर्वांसमोर अभिमानाने उभा आहे. मला देवानं जसं बनवलं आहे त्याबाबत मी आता अजिबात द्वेष सहन करणार नाही. मी ही गोष्ट गेली काही वर्षे लपवली होती आणि त्यातून मला खूप झाला आहे. माझ्या कुटुंबीयांनी मला सोडून दिलं. पार्थ समथान आणि प्रियांक शर्मा यांनी मला खूप वाईट वागणूक दिली.’
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत झालेल्या वादानंतर विकास गुप्ता प्रकाशझोतात आला होता. विकास या मालिकेचा निर्माता आहे. शिल्पाला मालिकेतून मध्येच काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर तिने विकासवर काही आरोप केले होते. त्यानंतर ‘बिग बॉस ११’ या रिअॅलिटी शोमध्येही विकास चर्चेत होता.