भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधानाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर रविवारी २५ सप्टेंबर रोजी मुंबईत त्यांच्या स्मरणार्थ एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. जॉनी लीव्हर, सुनील पाल, कपिल शर्मा, भारती सिंग, किकू शारदा यांसारखे अनेक आघाडीचे कॉमेडियन या शोकसभेत सहभागी झाले होते. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते.

आणखी वाचा : ‘गन्स अँड गुलाब’चा टीझर प्रदर्शित, अभिनेता राजकुमार राव दिसणार वेगळ्या भूमिकेत

मीडियाशी संवाद साधताना जॉनी लीव्हर यांनी राजू श्रीवास्तव यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या बॉन्डिंगबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. ते म्हणाले, ‘माझ्याबरोबरच राजूचेही स्ट्रगल सुरु झाले. आमचे कौटुंबिक संबंध होते आणि आम्ही शेजारीही आहोत. आपण सर्वांनी एक उत्कृष्ट कलाकार गमावला आहे. राजूने अनेक वर्षे अनेकांना हसवले पण अचानक आम्हाला सोडून गेला. स्टँडअप कॉमेडीसाठी हे खूप मोठे नुकसान आहे.” या शोकसभेत भारती सिंगलाही अश्रू अनावर झाले. यावेळी कपिल शर्माने भारतीला कारमध्ये सोडले.

स्टॅंडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी(२१ सप्टेंबर) रोजी सकाळी दहा वाजून २० मिनिटांनी निधन झाले. २२ सप्टेंबरला त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : Raju Srivastava : जेव्हा राजू श्रीवास्तव यांच्या घरी झाली होती चोरी…

राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ४० दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. परंतु, ही झुंज अपयशी ठरली आणि २१ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप देताना मित्रपरिवार आणि चाहत्यांना अश्रु अनावर झाले होते.