‘जनता तुला माफ करणार नाही’; रियाला पाठिंबा देणाऱ्या आयुषमानवर संतापला अभिनेता

सुशांत मृत्यू प्रकरणात आयुषमान खुरानाने दिला रिया चक्रवर्तीला पाठिंबा

अभिनेता कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने अभिनेता अयुषमान खुरानावर निशाणा साधला आहे. आयुषमानने सुशांत मृत्यू प्रकरणात रियाला पाठिंबा दिला. यामुळे केआरकेने त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. सुशांत आयुषमानचा प्रतिस्पर्धी होता त्यामुळे त्याने रियाला पाठिंबा दिलाय, असं म्हणत केआरकेने जोरदार टिका केली आहे.

Justice For Sushant: अमेरिकेतील चाहत्यांचा सुशांतच्या कुटुंबीयांना पाठिंबा

अवश्य पाहा – WWE मध्ये नोकर कपात; या सुपरस्टार्सला दाखवला बाहेरचा रस्ता

“आयुषमानने रिया चक्रवर्ती आणि घराणेशाहीला पाठिंबा देण्यामागे तीन कारणं आहेत. एक – त्याला बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे आहे. दोन – तो यशराज फिल्म कंपनीसोबत काम करतोय. तीन – सुशांत त्याचा प्रतिस्पर्धी होता. चिंता करुन नकोस खुराना तुझे नवे चित्रपट येतायत. तुला प्रेक्षक चांगलाच धडा शिकवतील. ऑल द बेस्ट.” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेने आयुषमान विरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला दोषी समजले जात आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. या प्रकरणी सध्या ईडी आणि CBI मार्फत चौकशी सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kamaal r khan ayushmann khurrana rhea chakraborty sushant singh rajput death case mppg

ताज्या बातम्या