दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या ‘गहराइयां’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटात दीपिकाने काही इंटिमेट सीन्स दिले आहेत. दीपिका आणि अभिनेता सिद्धांतमधील एक किसींग सीन चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे तिच्यावर टीकाही होत आहे. दीपिकाच्या ‘गहराइयां’ चित्रपटाला प्रेक्षकांसह चित्रपट समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत हिने या चित्रपटातील बोल्ड सीनवर प्रतिक्रिया केली आहे. यावेळी तिने अप्रत्यक्षरित्या प्रसिद्ध निर्माता करण जौहरवर टीका केली आहे.
कंगना रणौत आणि करण जौहर यांच्यात नेहमीच काही ना काही कारणांमुळे खटके उडत असतेत. कंगना ही करण जौहरच्या अनेक चित्रपटांवर टीका करण्याची एक संधी सोडत नाहीत. नुकतंच कंगनाने करण जौहरच्या ‘गहराइयां’ चित्रपटावर टीका केली आहे. कंगना राणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने करण जौहरचे नाव न घेता दीपिकाच्या चित्रपटाला अश्लील चित्रपट असे म्हटले आहे.

कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावर तिने मनोज कुमार यांच्या ‘हिमालय की लाड में’ या चित्रपटातील ‘चांद सी मेहबूबा’ या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना कंगनाने म्हटले की, “मी सुद्धा या वयाची आहे. मलाही रोमान्सही समजतो. नवीन युग आणि शहरीकरणाच्या चित्रपटाच्या नावाखाली कृपया असला कचरा विकू नका. वाईट चित्रपट हा वाईटच असतो. कोणताही स्किन शो किंवा पो*ग्राफी त्याला वाचवू शकत नाही. हे एक मूलभूत सत्य आहे, त्यात ‘गहराइयां’ असण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही.”
दीपिकाचा ‘गहराइयां’ हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केलं आहे. दरम्यान, दीपिका लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या पठान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. या व्यतिरिक्त हृतिक रोशनसोबत ‘फाइटर’ या चित्रपटात दिसणार आहे.