छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि गाजलेला शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची संपूर्ण टीम आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. या शो मध्ये नेहमीच विविध कलाकार हजेरी लावतात. नुकतंच या शो मध्ये अभिनेता अक्षय कुमारने हजेरी लावली. ‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या संपूर्ण टीमने कार्यक्रमात उपस्थित होते.

नुकतंच सोनी टिव्हीने याबाबतचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षय कुमारसह सारा अली खान आणि दिग्दर्शक आनंद एल. रॉय हे देखील मंचावर उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेल्या अक्षय कुमारने यावेळी प्रेक्षकांना जादूच्या काही ट्रिक्सही दाखवल्या. त्याच्या या ट्रिक्स पाहून सर्वचजण चकित झाले.

यानंतर काही वेळाने कपिल शर्मा त्या ठिकाणी येतो आणि त्याची मस्करी करण्यास सुरुवात करतो. यापूर्वी मला वाटायचे की, अक्षयचे चित्रपट आमच्या शो मध्ये येतात. मात्र आता असे वाटतंय की आमचा शो हा अक्षयच्या चित्रपटांमध्ये येतो. हे ऐकून सर्वचजण हसायला लागतात.

यानंतर काही वेळाने सारा अली खानची मंचावर एंट्री होते. यावेळी कपिल अक्षयची मस्करी करत त्याला विचारतो की, “तू शर्मिला टागोरसोबत काम केले आहेस. तिचा मुलगा सैफ अली खानसोबत काम केलंस आणि आता तू सारा अली खानसोबत काम करत आहेस. पण आता आम्ही असं ऐकलंय की तुझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे, ज्यात तू तैमूर आणि त्या काळात जी कोणी अभिनेत्री असेल तिच्यासोबत काम करणार आहेस. हा चित्रपट लव्ह ट्रायगँल असणार आहे, हे खरंय का?” कपिल शर्माचा हा प्रश्न ऐकून अक्षय सर्वच उपस्थित प्रेक्षक हसायला लागतात.

यावर अक्षय हसत हसत उत्तर देतो आणि म्हणतो की, मला तर तैमूरच्या मुलासोबतही काम करायचे आहे. यानंतर अक्षय हा कतरिनाच्या लग्नावरुनही मस्करी करताना दिसत आहे. तुम्ही त्या लग्नात किट-कॅट नक्कीच खाल्ली असाल, असेही तो मस्करी करताना म्हणतो.

लग्नाच्या एका आठवड्यानंतर कतरिना कैफने बदलला इन्स्टाग्राम प्रोफाईल फोटो, तुम्ही पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सारा अली खानचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सारासोबत या चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुष दिसणार आहेत. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.