गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड विरुद्ध साऊथ सिनेमांबद्दल मोठ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दाक्षिण्यात्य सिनेमांना सातत्याने मोठी पसंती मिळताना दिसतेय. एककडे साऊथ सिनेमा सुपरहिट ठरत असताना दुसरीकडे बॉलिवूड सिनेमा मात्र एकामागून फ्लॉप ठरत आहेत. बॉक्स ऑफिसवरही बॉलिवूड सिनेमांची कमाई चांगली होत नाहीय. त्यामुळेच हिंदी सिनेमांचा दबदबा कमी झालाय का? बॉलिवूडला ग्रहण लागलाय का? असे प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत. असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मात्र फिल्म मेकर करण जोहरने उत्तर दिलंय.

हे देखील वाचा: “लोकांकडे खूपच रिकामा वेळ आहे”, रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरील वादावर करीनाची प्रतिक्रिया

आमिर खान, सलमान खान आणि अक्षय कुमारचे आगमी काळात येणारे सिनेमे बॉक्स ऑफिसवर त्यांची कमाल दाखवतील अशी आशा करणने यावेळी व्यक्त केली. “प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणणं आता तेवढं सोप राहिलेलं नाही. तुमच्या सिनेमाचा ट्रेलर तसचं त्याचं प्रमोशन सगळं काही अगदी उत्कृष्ट असेल याची खात्री करणं आधी गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण ताकदीने प्रयत्न करावे लागतील. खरं तर हे एक मोठं आव्हान आहे. पण मला आव्हानं आवडतात.” असं करण जोहर म्हणाला.

हे देखील वाचा: “मी कोणती मशीन आहे का?” तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांबाबत स्पष्टच बोलली करीना कपूर खा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा करण जोहरचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग नुकतच पूर्ण झालंय. या सिनेमातून आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र, शबाना आजमी, जया बच्चन आणि प्रीति झिंटा ही स्टार कास्ट झळकणार आहे. शिवाय जवळपास सहा वर्षांनंतर या सिनेमासाठी करण जौहरने पुन्हा एकदा दिग्दर्शन केलंय.